Ticker

6/recent/ticker-posts

आषाढी एकादशी माहिती | ashadhi ekadashi mahiti | आषाढी एकादशी निबंध |

 

                  By: school companion team


शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :



 





-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आषाढी एकादशी निबंध

आज आपण आषाढी एकादशीविषयी ( ashadhi ekadashi mahiti ) माहिती जाणून घेणार आहोत.
ही माहिती वाचून तुम्ही 'आषाढी एकादशी निबंध'        (ashadhi ekadashi nibandh) लिहू शकता.



               आषाढी एकादशी निबंध

महाराष्ट्राला संतांची भूमी समजली जाते.महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांसारख्या संतांनी संतपरंपरेचा वारसा जोपासला. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही,सगळे सारखे अशी समतेची भावना सर्व संतांनी लोकांच्या मनांत निर्माण केली.

महाराष्ट्रातील संतांच्या हृदयात स्थान असणारे, अवघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा. मराठी वर्षाच्या आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात जी एकादशी येते तिला आषाढी किंवा देवशयनी एकादशी ( ashadhi ekadashi ) असे म्हणतात. याच एकादशीला महाएकादशी असेही म्हणतात.

वर्षातील एकूण 24 एकादशीपैकी आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण याच एकादशीला महाराष्ट्रातील लाखो भाविक, वारकरी वारी घेऊन पंढरपूरला जातात जीवनात एकदातरी वारी अनुभवावी असे म्हटले जाते. महाराष्ट्रात सुमारे आठशे वर्षांपासून वारीची ही परंपरा पाळली जाते असे म्हणतात. 


आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते. अशी आख्यायिका आहे की आषाढी एकादशीला भगवान विष्णू शेष नागावर निद्रिस्थ होतात आणि चातुर्मासानंतर कार्तिकेय एकादशीला जागे होतात.


आषाढी एकादशीला आळंदीवरून ज्ञानेश्वरांची, देहूवरून तुकारामांची, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, उत्तर भारतातून संत कबीर यांची, तर पैठणवरून एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी येतात. या पालख्यांबरोबर सर्व भाविक पायी विठूनामाचा गजर करत पंढरपूरला पोहचतात. एकादशीच्या दिवशी पहाटे उठून चंद्रभागेच्या तीरी स्नान करतात. तुळस वाहून विष्णूची पूजा करतात. दर्शन घेतात. विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाचे दर्शन घेतात.या दिवशी सर्व भाविक उपवास करतात.


आपल्या शेतात पेरणी करूनच हे शेतकरी बांधव वारीला निघतात. पंढरपूरला विठोबाच्या पायी मस्तक ठेवून यंदाची सुगी चांगली येऊ देत, अवघ्या मानवजातीवर कोणतेही संकट येऊ देऊ नकोस असं मागणं तो विठोबाकडे मागतो. मोठ्या भक्तिभावाने महाराष्ट्रातील लाखो भाविक ही परंपरा पाळताना दिसून येतात.


आषाढ महिन्यात पाऊस असतो. अग्नी मंद होऊन पचनसंस्था मंदावलेली असते.अशावेळी जड पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी योग्य नसते. अशावेळी पचायला सोपे पदार्थ खाणे, कमी आहार घेणे हे उपयुक्त ठरते. आणि म्हणूनच या काळात उपवास करणे आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे. अशाप्रकारे आषाढी एकादशीचा वैज्ञानिक संबंधही लावता येतो. 

तुम्हांला आषाढी एकादशी माहिती (ashadhi ekadashi mahiti) / आषाढी एकादशी निबंध (ashadhi ekadashi nibandh)कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा. आणखी कोणत्या विषयावर निबंध वाचायला आवडेल तेही सांगा.


हे ही वाचा :  माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध

शैक्षणिक, नोकरी व रोजगाराच्या संधी, घडामोडी, शिष्यवृत्ती सराव, स्पर्धा परीक्षा इत्यादींबाबत जाणून घेण्यासाठी व्हॉट्सॲप समूहात सामील व्हा..



हे ही वाचा : अध्ययन अभ्यास सर्वेक्षण २०२२ इयत्ता निहाय व विषयनिहाय साहित्य | विदयार्थी संपादणूक स्तर असे ठरवा |सर्वेक्षण श्रेणी नोंद प्रपत्र Excel | 

हे ही वाचा : नवीन शैक्षणिक धोरण 2020

हे ही वाचा : अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ?

हे ही वाचा : FLN अंतर्गत माता - पालक गटाची बांधणी व लीडर माता निवडेनणेबाबत. 

हे ही वाचा : निपुण भारत अंतर्गत राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्याचे निर्देश | भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन जयंती

हे ही वाचा : पाठ्यपुस्तकातील वह्यांचे पानाबाबत मार्गदर्शक सूचना

पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022 इयत्ता 2री ते 10वी पूर्वचाचणी : डाऊनलोड करा




Post a Comment

2 Comments