आज आपण राष्ट्रीय गणित दिवस म्हणजे काय ? तो का साजरा करायचा ? हा दिवस साजरा करण्यासाठी कोणकोणत्या उपक्रमांचे आयोजन करता येऊ शकते याबद्दल सविस्तर माहिती घेऊ.
थोर भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी 22 डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी 'राष्ट्रीय गणित दिवस' म्हणून साजरा केला जातो. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी कोइंबतूरच्या (ब्रिटिशकालीन मद्रास प्रांत) इरोड या गावात झाला. ते जन्माने ब्राह्मण होते. त्यांच्या आईचे नाव कोमलताम्मल आणि वडिलांचे नाव श्रीनिवास अयंगार होते.
रामानुजन लहान असतानाच त्यांचे संपूर्ण कुटुंब कुंभकोणममधे गेले. या ठिकाणी त्यांचे वडिलांनी एका कापडाच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली.
रामानुजन हे लहानपणापासूनच खूप हुशार होते. वयाच्या फक्त सातव्या वर्षीच त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करावे लागले. रामानुजन यांना असामान्य बुद्धिमत्ता लाभली होती. गणित या विषयात त्यांना विशेष रुची होती. गणितातील विविध प्रमेये, सिध्दांत ते अगदी चुटकीसरशी सोडवून दाखवत असत. ते बघून शिक्षकही आश्चर्यचकित होत असत. असे असले तरी ते गणित विषय सोडून इतर विषयांचा अभ्यास आवडीने करत नसत आणि म्हणून ते अकरावीला एकदा व बारावीला दोनदा नापास झाले.
रामानुजन यांना शाळेत शिकवण्याची पद्घत अजिबात आवडत नव्हती. रामानुजन यांना फक्त गणित हा विषय आवडायचा. त्यामुळे त्यांचं इतर विषयाकडे दुर्लक्ष व्हायचे.याचा परिणाम असा झाला की ते अकरावीला एकदा व बारावीला दोनदा नापास झाले. मात्र गणित विषयातील त्यांची कामगिरी अफाट अशीच आहे. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी 'ए सिनोप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्ट्स इन प्योर अँड एप्लाइड मॅथेमॅटिक्स' नावाच्या एका खूप जुन्या पुस्तकाचा सखोल अभ्यास केला.या पुस्तकातील हजारो प्रमेयांचा त्यांनी खूप अभ्यास केला. पुढे या कामगिरीसाठी त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली. रामानुजन यांच्या तेविसाव्या वर्षी पहिला संशोधनपर लेख 'इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या' नियतकालिकात 1911 साली छापून आला. या लेखामुळे त्यांना जगात ओळख मिळाली. गणिताच्या संशोधन क्षेत्रात त्यांचे नाव लोक आता अतिशय आदराने घ्यायला लागले. यानंतर 1912 मध्ये त्यांनी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये लिपिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. असे असले तरी त्यांची गणीताकडची ओढ कमी झाली नव्हती.
याच दरम्यान त्यांना थोर ब्रिटिश गणितज्ञ जी. एच. हार्डी यांच्या बद्दल माहिती समजली. रामानुजन यांनी जी. एच हार्डी यांच्यांबरोबर पत्रव्यवहार केला. त्यांनी आपली कामे हार्डी यांना पत्राद्वारे पाठवले. सुरुवातीस कामाच्या गडबडीत हार्डी यांनी त्यांच्या पत्राकडे दुर्लक्ष केले, मात्र लवकरच रामानुजन यांचा सखोल अभ्यास, त्यांची प्रतिभा त्यांच्या लक्षात आली. मग, त्यांनी सुध्दा रामानुजन यांच्याबरोबर पत्रव्यवहार केला. हार्डी यांनी रामानुजन यांना सुरुवातीला मद्रास विद्यापीठात व नंतर केंब्रिज विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी मदत केली. इंग्लंडमध्ये शिष्यवृत्ती मिळाल्यावर ते 17 मार्च 1914 रोजी इंग्लंडला रवाना झाले. जी.एच. हार्डी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वतःचे 20 संशोधन पेपर्स प्रकाशित केले. 1916 मध्ये रामानुजन यांनी केंब्रिज द्यापीठातून विज्ञान विषयातील पदवी प्राप्त केली. त्याचबरोबर पुढे त्यांनी ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिपही मिळवली. या कॉलेजची फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. एव्हढेच नव्हे तर 1918 मध्ये ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य झाले. त्यावेळी भारतावर इंग्रजांची सत्ता होती. त्यामुळे या गोष्टीला ऐतिहासिक महत्व आहे. एव्हढ्या कमी वयात रॉयल सोसायटीचे सदस्यत्व मिळवणारे ते पहिले भारतीय होते.
रामानुजन यांनी इंग्लंडमध्ये असताना खूप कष्ट केले. त्यांनी स्वतःला सतत गणिताच्या अभ्यासात गढून घेतले होते. पण इंग्लंडचे थंड व ओलसर हवामान त्यांना मानवले नाही. 1919 साली रामानुजन मायदेशी परत आले. त्यांना क्षय हा असाध्य आजार झाला होता. वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी 26 एप्रिल 1990 रोजी हे महान गणितज्ञ जग सोडून गेले. त्यांच्या या अकाली निधनाने केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे तसेच गणितविश्वाचे नुकसान झाले.
रामानुजन यांच्या जयंतनिमित्त विविध कार्यक्रम :
देशात श्रीनिवास रामानुजन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळा, कॉलेजमध्ये 'गणितोत्सव' आयोजित केला जातो. यावर्षी सन 2022 मध्येही महाराष्ट्र शासनातर्फे ' आयोजित करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्याची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे...
रामानुजन जयंतीनिमित्त शालेय स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उपयुक्त पुस्तक /PDF
परिसरातील गणित उदाहरणे, मजेशीर कोडी, गणितज्ञ माहिती : download
0 Comments