By: school companion team
शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शैक्षणिक क्षेत्रात अध्ययन निष्पत्ती ही एक महत्वाची संज्ञा समजली जाते.अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय? अध्ययन निष्पत्तीवर आधारीत कृती आराखडा आणि अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपत्रिका यांचा सखोल अभ्यास आपण करणार आहोत.
नवीन शैक्षणिक धोरण आणि अध्ययन निष्पत्ती
तब्बल 34 वर्षानंतर आपल्या देशात 'नवीन शैक्षणिक धोरण २०२०' जाहीर करण्यात आले आहे. या शैक्षणिक धोरणात स्पष्टपणे असे सांगण्यात आले आहे की, मुलांना शिक्षण हे ताणतणावरहित वातावरणात मिळायला हवे, आपले प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून पूर्ण करता यायला हवे.मुलांना विभागवार व गरजाधिष्ठित शिक्षण मिळायला हवे.त्याचप्रमाणे शिक्षणात ‘कौशल्य विकास व अध्ययन निष्पत्तीवर’ भर देण्यात यावा. आणि म्हणूनच इयात्तावार अध्ययन निष्पत्तींचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते.
अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ?
विद्यार्थ्याने विषय शिकल्यानंतर काय साध्य झाले पाहिजे त्याला कोणती कौशल्ये आत्मसात झाली पाहिजे कुठल्या क्षमता विकसित झाल्या पाहिजे यालाच learning outcomes किंवा अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात.
शैक्षणिक सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या क्षमता आत्मसात केल्या ? हे पाहायला पाहिजे. ह्या क्षमता म्हणजेच अध्ययन निष्पत्ती होय.
वर्गाच्या प्रत्येक वर्षीच्या क्षमता ठरवलेल्या असतात. वर्षाच्या शेवटी मुलांनी या क्षमता अवगत करणे आवश्यक असते. मुलांनी त्यात प्रवीण असायला हवे, अशा बाबतीत अध्ययन निष्पत्ती साध्य झाल्या असे म्हणता येईल.
अध्ययन निष्पत्ती कृती आराखडा
अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी त्या त्या वर्गाच्या अध्ययन निष्पत्तीचा अभ्यास असायला हवा. त्यावर आधारित कोणते अध्ययन अनुभव मुलांना देता येणे शक्य आहे याचा विचार करायला हवा.अध्ययन निष्पत्ती व छोट्या छोट्या कृतींचा मेळ वर्गाच्या स्तरावर घातला पाहिजे.
शाळा सिद्धी
0 Comments