By: school companion team
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्हां मुलांना शाळेत नेहमी 'माझी उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध' लिहायला सांगितला जातो.खरंतर हा निबंध अतिशय सोपा असतो. My summer vacation essay मध्ये आपण आपली उन्हाळ्याची सुट्टी कशी गेली, आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय केले, कोणत्या नवीन गोष्टी केल्या, कोणत्या नवीन ठिकाणी तुम्ही भेट दिली का, तेथील गमतीजमती, कोणते खेळ खेळले, एखादा नवीन अनुभव तुम्हांला आला का? इत्यादी मुद्यांचा समावेश करू शकतो.आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी 'माझी उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध' (mazi unhalyachi sutti marathi nibandh) सादर करत आहोत.
माझी उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध | mazi unhalyachi sutti marathi nibandh | my summer vacation essay |
खरंतर,एप्रिल महिना सुरू होतो तेव्हाच मला उन्हाळ्याच्या सुट्टीचे वेध लागलेले असतात. यावर्षीही असेच घडले. एप्रिल महिना सुरू झाला. आमच्या शाळेत परीक्षेचे वारे वाहू लागले.मी सुध्दा अभ्यासात गढून गेलो होतो.खूप अभ्यास केला आणि सर्व पेपर अगदी सोपे गेले तरच आपल्याला उन्हाळ्याची सुट्टी आनंदात घालवता येईल असे मनाला कुठेतरी वाटत होते. एकामागोमाग एक पेपर देत शेवटी तो शेवटचा पेपर दिला, आणि मी आनंदाने उडी मारली. आम्हांला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती !
मला, आठवतंय मी त्यादिवशी अगदी आनंदातच घरी आलो होतो. घरी आल्यावर मी सर्वात प्रथम माझी डायरी घेतली. या उन्हाळ्याची सुट्टी कशी घालवायची, काय काय करायचे, कोणत्या नवीन गोष्टी शिकायच्या, कुठे कुठे जायचं ? या साऱ्या गोष्टींचे नियोजन मी माझ्या डायरीत सविस्तर लिहून काढले.मग, मी माझी डायरी बाबांना दाखवली. बाबांनी डायरी वाचून मला 'खूपच छान' असे म्हणत शाबासकी दिली.
दर, सुट्टीत माझे लक्ष जास्तकरून वेगवेगळे खेळ खेळण्याकडेच असते. या सुट्टीत काहीतरी वेगळे करण्याचे मी ठरवले. आमच्या घराच्या शेजारी अनेक घरे आहेत. त्यापैकी काही घरात आजी-आजोबाही होते. तशी, त्यांची आणि माझी थोडी ओळख होतीच. मी या आजी-आजोबांना मदत करायची ठरवले !
मी एका दिवशी एका आजी- आजोबांना भेटायला जायचो. त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारायचो. त्यांना दुकानातून काही आणायचे असेल तर ते मी आणून द्यायचो. त्यांना कोणकोणत्या अडचणी येतात हे मी जाणून घेतले.बऱ्याच आजी-आजोबांनी आम्हांला खूप एकटे-एकटे वाटते असे सांगितले. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी त्यांची भेट घेतल्याने त्यांना खूप बरे वाटले असे त्यांनी सांगितले.पुन्हा काही मदत लागल्यास मला नक्की सांगा, असे सांगून मी त्यांचा निरोप घेत असे.
त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट मी ठरवली होती ती म्हणजे, 'रोजनिशी लिहायची' ही! आमच्या सरांनी खूप दिवसांपूर्वीच आम्हाला रोजनिशी लिहायला सांगितले होते. ती कशी लिहायची हेही सांगितले होते. काही कारणाने माझ्याकडून ही गोष्ट राहून जात होती. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मात्र मी रोजनिशीचे अगदी ठरवून उद्घाटन केले ! दिवसभरात जे जे काही होईल, जे काही आपल्याला अनुभव येतील, ते मी डायरीत लिहू लागलो. 'माझी उन्हाळ्याची सुट्टी' (my summer vacation) असं शीर्षक देऊन त्याखाली या उन्हाळ्यातील गमतीजमती लिहिल्या.आता रोजनिशी लिहायची सवय लागल्याने मला खूप फायदा होत आहे. रोजनिशी लिहिताना माझे मन अगदी शांत होते. दिवसभरात घडणाऱ्या गोष्टींकडे मी जाणीवपूर्वक पाहू लागलो. माझ्या चुकाही मला समजू लागल्या. आता, मी न चुकता दररोज रोजनिशी लिहितो.
याचबरोबर, या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या मित्रांबरोबर क्रिकेटही खेळलो. आम्ही सर्वांनी मिळून एक मातीचा किल्ला सुद्धा तयार केला. बाबांनी मला पोहायला शिकवले.उन्हाळ्याच्या सुट्टीत अशा अविस्मरणीय वेगवेगळ्या गोष्टी मी केल्या. नवीन-नवीन गोष्टी शिकायला, नवे प्रयोग करायला मिळत असल्यामुळेच मला उन्हाळ्याची सुट्टी (summer vacation) खूप आवडते.
1 Comments
Nice
ReplyDelete