Ticker

6/recent/ticker-posts

अध्ययन अभ्यास सर्वेक्षण इयत्ता निहाय व विषयनिहाय साहित्य | विदयार्थी संपादणूक स्तर असे ठरवा |सर्वेक्षण श्रेणी नोंद प्रपत्र Excel |

निपुण भारत सर्वेक्षण

निपुण भारत सर्वेक्षण काय आहे ?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार प्राथमिक स्तरावर सन २०२६ २७ पर्यंत पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यासाठी भारत सरकारने निपुण भारत अभियानाची अंमलबजावणी सुरु केली आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता तिसरीपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विषयक क्षमता सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. सदर लक्ष्य गाठण्यासाठी इयत्ता व अध्ययन निष्पत्तीनिहाय बेंचमार्क निर्धारित करण्यात आलेले आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने दि. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रात निपुण भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

निपुण भारत अभियानाच्या लक्ष्यपूर्तीसाठी विद्यार्थ्यच्या संपादणूकीच्या सध्य स्थितीची वेळोवेळी पडताळणी होणे आवश्यक आहे, या करिता राज्यस्तरावरून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करण्यात येत आहे.

अ) निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण उद्दिष्टः

प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त /संपादित कैलेल्या आहेत हे पडताळणे व त्यानुसार शिक्षकांनी उपचारात्मक अध्यापन करणे..

ब ) निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण कार्यवाही:

 १) इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी विषयनिहाय व माध्यमनिहाय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे https://www.maa.ac.in संकेतस्थळावर निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधन ऑनलाईन pdf स्वरुपात शिक्षकांसाठी उपलब्ध असणार आहेत.

२) सदर सर्वेक्षण हे सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांनी करावयाचे आहे.

(३) विद्यार्थी शिकत असलेल्या पूर्वीच्या पाठीमागील इयत्तेच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित निपुण भारत : अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधन तयार करण्यात आलेले आहे.

(४) इयत्ता दुसरी ते पाचवीला प्रथम भाषा, गणित, परिसर अभ्यास, तृतीय भाषा या विषयांच्या शिक्षकांनी आपण अध्यापन करीत असलेल्या विषयाच्या सर्वेक्षण साधनाची एकच प्रिंट अथवा फोटोकॉपी करण्यात यावी. प्रती विद्यार्थी सर्वेक्षण साधन प्रिंट अथवा फोटो कॉपी करण्याची गरज नाही.

५) सदर सर्वेक्षण प्रत्येक विद्यार्थीनिहाय मौखिक स्वरूपात घ्यावयाचे आहे. मात्र काही प्रश्नांच्या /कृतींच्या बाबतीत लेखी प्रतिसाद घ्यावयाचा असल्यास तो विद्यार्थ्यांच्या वहीमध्ये किंवा आखीव ताव / पेपरवर घ्यावा.

६) निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करताना वर्गात तणावमुक्त वातावरणात राहील, याची काळजी घ्यावी.

(७) सर्वेक्षणास सुरवात करण्यापूर्वी इयत्ता व विषयनिहाय आवश्यक असलेले साहित्य शिक्षकांनी उपलब्ध करून ठेवावे..

८) दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांचा दिव्यांग प्रकार लक्षात घेऊन शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.

९) सर्वेक्षण साधनातील प्रश्न विद्यार्थ्याला क्रमवार विचारावे अथवा सोडवण्यास सांगावे. सर्वेक्षण साधनातील दिलेले प्रश्न / कृती चित्रे, उदाहरणे, परिच्छेद इत्यादी आवश्यतेनुसार विद्यार्थ्यांना दाखवावेत किंवा फलकावर लिहावेत.

१०) विद्यार्थ्याला प्रश्न / कृती सोडवण्यासाठी, अथवा उत्तराचा प्रतिसाद देण्यासाठी पुरेसा वेळ द्या. विद्यार्थी काहीच प्रतिसाद देत नसेल तर पुढील प्रश्नांकडे/कृतीकडे जावे.

११) निपुण भारत : अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधनामध्ये अध्ययन निष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन करण्यासाठी "मूल्यांकन रुब्रिक" देण्यात आलेले आहे. 

१२) प्रत्येक विद्यार्थ्याला विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीवरील प्रत्येक प्रश्नाच्या / कृतीच्या प्रतिसादाची नोंद निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद पत्रकामध्ये शिक्षकांनी करावी. ही नोंद अध्ययन निष्पत्तीनिहाय प्रश्न विचारून आलेल्या प्रतिसादानुसार मूल्यांकन रुब्रिक" मधील निकषानुसार त्या त्या वेळी करावी. सोबत निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद पत्र जोडण्यात आलेले आहे. शिक्षकांनी प्रत्येक विषयासाठी आवश्यकतेनुसार प्रिंट अथवा फोटो कॉपी काढाव्यात अथवा असा नमुना आपण स्वत: तयार करावा.

१३) मूल्यांकन रुब्रिक मध्ये प्रामुख्याने चार मूल्यांकन निकष देण्यात आलेले आहेत. सर्वेक्षण साधन मधील अध्ययन निष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नाच्या प्रतिसादावरून विद्यार्थ्याच्या संपादणूकीचे वर्गीकरण "मूल्यांकन रुब्रिक" नुसार श्रेणी ३, श्रेणी २ श्रेणी १ श्रेणी ० यापैकी एका श्रेणीमध्ये होईल.

१४) प्रत्येक प्रश्नावरील विद्यार्थी प्रतिसादानंतर शिक्षकांनी मूल्यांकन रुब्रिक निकषानुसार श्रेणी निश्चित केल्यानंतर निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद पत्रकामध्ये शिक्षकांनी योग्य त्या ठिकाणी टिक/खूण करावी

१५. उदा. निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद नमुना प्रपत्र
निपुण सर्वेक्षण श्रेणी नमुना

मूल्यमापन नेमके कसे करायचे ?

प्रत्येक अध्ययन निष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नावर आधारित मूल्यांकन रुब्रिक नुसार विद्यार्थी अध्ययन श्रेणी निश्चित करावयाची आहे. प्रत्येक प्रश्नाच्या रुब्रिकमध्ये चार मूल्यांकन निकष असणार आहेत. प्रत्येक निकषाला ०, १, २ व ३ अशी श्रेणी देण्यात आलेली आहे. यामुळे प्रत्येक मूल्यांकन रुब्रिकनिहाय आलेल्या विद्यार्थी प्रतिसादाचे / उत्तराचे वर्गीकरण खाली दिलेल्या स्तरावर होईल.   

१. प्रारंभिक (Below Basic / Beginners)

या स्तरामधील विद्यार्थ्यांच्या संबधित विषयाच्या / विषयाची अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी ज्ञान व कौशल्ये पुरेशा प्रमाणात प्राप्त /संपादित झालेली / झालेल्या नसतात. या विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या प्रत्येक टप्प्यावर खूप मार्गदर्शनाची, प्रोत्साहन देण्याची गरज असते.

२. प्रगतशील (Basic /Progressive )

या स्तरामधील विद्यार्थ्यांने संबधित विषयाच्या / विषयाची अध्ययन निष्पत्तीमधील किमान ज्ञान व कौशल्ये प्राप्त/संपादित केलेली असतात. हे विद्यार्थी सामान्य सूचनांचे/नियमांचे पालन/अनुकरण करतात. त्यांच्याकडे काही चांगल्या कल्पना असतात. मात्र त्यामध्ये सुसंगतता नसते. अध्ययनाच्या अनेक टप्प्यावर यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. सामान्य समस्या ते तर्काने सोडवू शकतात. या पातळीवरील विद्यार्थी सोप्या भाषेत आपले म्हणणे अभिव्यक्त करतात.

३. प्रवीण (Proficient)


या स्तरामधील विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती बऱ्याच प्रमाणात प्राप्त /संपादित केलेल्या असतात. या स्तरावरील विद्यार्थी कमीत कमी निरीक्षणाखाली ते आपले कार्य स्वतंत्रपणेकरतात. पद्धतशीरपणे ते आपली समस्या निराकरण करतात. स्वत:च्या कल्पना ते इतरांना स्पष्टपणे सांगतात. कमीत कमी मार्गदनाखाली व पर्यवेक्षणाखाली ते नवीन कल्पना मांडतात किंवा निर्माण करतात.

४. प्रगत (Advanced)

या स्तरामधील विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती पूर्ण संपादित/ प्राप्त केलेल्या असतात. अशा विद्यार्थ्यामध्ये उच्च विश्लेषण क्षमता, तार्किक क्षमता, चिकित्सक विचार, प्रभावी संप्रेषण कौशल्य, स्वतंत्र विचार क्षमता, सृजनशीलता असते. असे विद्यार्थी काही एकत्रित संकल्पना अथवा कल्पना याद्वारे नवीन ज्ञानाची निर्मिती करतात. या स्तरामधील विद्यार्थी कठीण समस्येचे निराकरण करतात. प्राप्त परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असते.

विद्यार्थ्यास शिक्षकांनी मूल्यांकन रुब्रिकमधील जास्तीत जास्त वरची श्रेणी / स्तर मिळावेत या हेतूने विद्यार्थ्यांना सर्वेक्षण पूर्वी अथवा सर्वेक्षणाच्यावेळी अतिरिक्त मदत करू नये, असे केल्यास विद्यार्थ्यास नेमक्या कोणत्या अध्ययन निष्पत्ती संपादित करण्यामध्ये अडचणी आहेत, हे समजू शकणार नाही. त्यामुळे त्यास उपचारात्मक अध्यापन करण्यास मदत होणार नाही. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी सर्वेक्षण करण्यात यावे.
दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर सर्वेक्षण घेण्याबाबतचा निर्णय संबधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.

प्रस्तावित सर्वेक्षणाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

इयत्ता २ री ते ५वी
प्रथम भाषा - २२ ते २४ डिसेंबर २०२२ - शाळेच्या वेळेत
इयत्ता २ री ते ५ वी 
गणित २६ ते २८ डिसेंबर २९२२ - शाळेच्या वेळेत
इयत्ता २ री ते ५ वी
तृतीय भाषा - २९ ते ३१ डिसेंबर २०२२ - शाळेच्या वेळेत
इयत्ता ४ थी ते ५ वी
परिसर अभ्यास भाग १ - ०२ ते ०४ जानेवारी २०२३ - शाळेच्या वेळेत
इयत्ता ४ थी ते ५ वी
परिसर अभ्यास भाग २ - ०५ ते ०७ जानेवारी २०२३ - शाळेच्या वेळेत.

चला, तर शिक्षक मित्रांनो,आता आपण डाऊनलोड करुया आपल्या वर्गासाठी निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधन / प्रश्नावली. हे साधन खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून pdf स्वरूपात डाऊनलोड करता येईल..


 


निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण झाल्यानंतर शिक्षकांनी करावयाची कार्यवाही:-

निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद प्रपत्रकाच्या आधारे शिक्षकांनी खालील कार्यवाही करावी.

१) अध्ययन निष्पत्तीनिहाय वर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थी हे कोणत्या स्तरात आहेत हेसमजल्यानंतर त्याच्या आधारे वर्ग शिक्षकांनी / विषय शिक्षकांनी उपचारात्मक अध्ययनअध्यापन करण्याची योजना आपल्या स्तरावर करणे अपेक्षित आहे..

२) शिक्षकांनी प्रत्येक अध्ययन निष्पत्तीमध्ये सर्व विद्यार्थी प्रगत स्तरावर जाण्यासाठी कृती योजना / आराखडा तयार करावा.

३) निपुण भारत अभियान वे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षकांनी अशाप्रकारे अध्ययन निष्पत्तीनिहाय प्रश्नपत्रिका / चाचण्यांचे विकसन आपल्या स्तरावर करून विद्यार्थी अपेक्षितक्षमता स्तर प्राप्त करतात की नाही याची आपल्या स्तरावर पडताळणी करणे देखील अपेक्षित आहे.

४) निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद प्रपत्रामध्ये विद्यार्थीनिहाय एकत्रित माहिती शाळा मुख्याध्यापक किंवा शिक्षकांनी इयत्तानिहाय व विषयनिहाय संकलित स्वरुपात शाळास्तरावर ठेवावी. ही माहिती सरळ पोर्टलवर भरणेबाबत यथावकाश सूचना देण्यात येतील. 

(५) निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद प्रपत्र याची प्रती विद्यार्थीनिहाय माहिती शिक्षकांच्या दप्तरी असणे आवश्यक आहे. 

सर्वेक्षणादरम्यान पर्यवेक्षीय अधिकारी यांच्याकडून शाळांना भेटी, कसे असणार नियोजन :

१) पर्यवेक्षीय अधिकारी  ज्या वेळी शाळाभेटीला येतील त्यावेळी विद्यार्थी अध्ययन श्रेणी व कृति योजना / आराखडा याबाबत चर्चा करण्यात यावी.

२) पर्यवेक्षीय अधिकारी ज्या वेळी शाळाभेटीला देतील त्यावेळी विद्यार्थी संपादणूक स्तर व विद्यार्थीनिहाय राबविण्यात येणारा कृति-कार्यक्रम याबाबत चर्चा करण्यात यावी. पर्यवेक्षीय अधिकारी यांनी बहुतांस विद्यार्थी वरच्या स्तरावर / पातळीवर कसे जातील यादृष्टीने शिक्षकांना शैक्षणिक सहाय्य, मार्गदर्शन व प्रोत्साहन द्यावे. 
 
३) जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन जिल्हा स्तरावरून करावे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, प्राचार्य व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी एकत्र बसून त्याचे नियोजन करावे.

 
४) जिल्हा स्तरावरून केलेले नियोजन त्या त्या तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे. 


५) सर्वेक्षण कालावधीपैकी आठवड्यातून दोन दिवस वेगवेगळ्या दोन शाळेस (एका दिवशी एक 
शाळा) अधिकाऱ्यांची भेट होईल असे नियोजन करावे. 

५) भेटी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण काळात कोणत्याही विद्यार्थ्यास कोणत्याही अनाहूत सूचना 
देऊ नयेत, जेणेकरून त्याचे लक्ष विचलित होईल. 

६) भेटीच्या दिवशी अधिकारी ज्या शाळेत जाणार आहे, त्या शाळेतील वेगवेगळ्या किमान ४ विद्यार्थ्याचे वेगवेगळ्या विषयांचे सर्वेक्षण (एक विद्यार्थी एकाच विषयाची सर्वेक्षण चाचणी) 

६) ज्या विद्यार्थ्याचे संबधित विषयाचे शिक्षकांनी/अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले आहे, पुन्हा त्यांच विद्यार्थ्याचे झालेल्या विषयाचे सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी / शिक्षकांनी करू नये. मात्र अधिकाऱ्यांनी केलेल्या विषयनिहाय निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद पत्रकामधील संबधित विद्यार्थ्याच्या नोंदी शिक्षकांनी आपल्याकडे सुद्धा घ्याव्यात.


उपरोक्त सूचनांचा विचार करून निपुण भारत : अध्ययन अभ्यास सर्वेक्षण उपरोक्त नमूद नियोजनाप्रमाणेच होईल याची नोंद घ्यावी.

निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण नोंद प्रपत्र Excel फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.. DOWNLOAD 

हे ही वाचा : निपुण भारत अभियानाबद्दल संपूर्ण माहिती

हे ही वाचा : नवीन शैक्षणिक धोरण 2020

शैक्षणिक अभ्यासपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा : व्हॉट्सॲप ग्रुप

शैक्षणिक अभ्यासपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : टेलिग्राम चॅनेल 


Post a Comment

0 Comments