Ticker

6/recent/ticker-posts

पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-23 | Bridge Course 2022-23 |

 

Bridge Course 2022-23

नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो.....
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्फत पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-23 तयार करण्यात आला आहे. या अभ्याक्रमाची अंमबजावणी दिनांक 17-06-2022 पासून करायची आहे. एकूण 30 दिवस हा अभ्यासक्रम राबवायचा आहे. सदर सेतू अभ्यासक्रम इयत्ता दुसरी ते दहावीसाठी बंधनकारक आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यासक्रमाचा कालावधी :

1. पूर्व चाचणी - दिनांक 17 ते 18 जून 2022
2. 30 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम  20 जून ते  23 जुलै.  
3.उत्तर चाचणी  दिनांक 25 ते 26 जुलै 2022

विद्यार्थ्यांनी खालील गोष्टी समजून घ्या :

विद्यार्थी मित्रांनो,नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होतंय पुन्हा नव्या जोमानं आपल्याला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला काही दिवस आपणाला मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमाची उजळणी करायला हवी जेणेकरून या वर्षीच्या अभ्यासक्रमासाठी चांगली पूर्वतयारी होईल. पूर्व तयारी करणे सोयीचे व्हावे यासाठीच हा सेतू अभ्यास तयार करण्यात आला आहे. 

मागील शैक्षणिक वर्षात तुम्ही नेमके काय शिकला हे समजण्यासाठी आणि पुढील इयत्तेचा पाठ्यक्रम समजून घेण्यासाठी हा सेतू अभ्यास तुम्हाला मदत करणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं? तर हा सेतू अभ्यास दिवसनिहाय क्रमाने सोडवायचा आहे. यात वेगवेगळ्या कृतींचा समावेश आहे. 

या कृती सोडवताना तुम्हांला मजा येईल पण लक्षात ठेवा या कृती दिवसनिहाय तयार केलेल्या आहेत. दिलेल्या नियोजनप्रमाणे कृती सोडवताना तुम्हाला काही अडचण आल्यास शिक्षक किंवा पालकांची मदत घ्या.

शिक्षकांनी खालील गोष्टी समजून घ्या :
मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा दुहेरी उद्देश ठेवून हा सेतू - अभ्यास तयार करण्यात आला आहे.सेतू अभ्यास हा मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमावर आधारित असून मागील इयत्तेचा पाठ्यक्रम व सध्याच्या इयत्तेचा पाठ्यक्रम यांना जोडणारा दुवा आहे.सदर अभ्यास हा इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून तो मागील इयत्तेच्या पाठ्यपुस्तकाशी संलग्न व त्यातील घटकांवर आधारित आहे. 

सदर सेतू अभ्यासात क्षेत्र, कौशल्ये, संकल्पना, अध्ययन निष्पत्ती, क्षमता विधाने यामधून विद्यार्थ्यांना नेमके काय मार्गदर्शन करायचे याचा समावेश केला आहे. विविध संकल्पनाप्रमाणे संबंधित संकल्पनेबाबत विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान जाणून घेण्यासाठी "जाणून घेऊ या " त्या संकल्पनेबाबत त्याने अधिक सक्षम व्हावे यासाठी "सक्षम होऊ या" मिळालेल्या माहितीचे किती आकलन झाले यासाठी "सराव करू या" व मिळालेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्याने आधी चिकित्सक विचार करावा अर्थात, सर्जनशील व्हावे, उच्च बोधात्मक क्षमतांच्या विकासासाठी "कल्पक होऊ या" या सदरांचा समावेश केला आहे.


सेतू अभ्यास एकूण ३० दिवसांचा आहे. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून सदरचा सेतूअभ्यास दिवसनिहाय नियोजनाप्रमाणे पूर्ण करून घ्यावा.


चला सराव करू या हे सदर विद्यार्थी स्वप्रयत्नाने सोडवतील याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे.


या सेतू अभ्यासात दिलेल्या अध्ययन कृती या मार्गदर्शक असून शिक्षक आपल्या वर्गाच्या व विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांच्या अध्ययन संदर्भात इतर आवश्यक त्या कृती घेऊ शकतात.
मागील वर्षीचा 45 दिवसांच्या सेतू अभ्यासक्रमाच्या यशस्वी अंमलबजाणीनंतर schoolcompanion.in पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-23 यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुढील महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी खाली follow बटणावर क्लिक करा...

पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022 इयत्ता 2री ते 10वी पूर्वचाचणी डाऊनलोड करा....

(अधिक माहितीसाठी व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा..

https://chat.whatsapp.com/LPeuv937S5vIq0NOTy2YOZ

 

अ. क्र. इयत्ता डाऊनलोड
1 2री येथे क्लिक करा
2 3री येथे क्लिक करा
3 4थी येथे क्लिक करा
4 5वी येथे क्लिक करा
5 6वी येथे क्लिक करा
6 7वी येथे क्लिक करा
7 8वी येथे क्लिक करा
8 9वी येथे क्लिक करा
9 10वी येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments