समूहदर्शक शब्द (Collective words) :
आज आपण ' समूहदर्शक शब्द' याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.100पेक्षाही जास्त शब्दांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत.
'समूहदर्शक शब्द' म्हणजे काय ? :
एकापेक्षा अधिक वस्तू, प्राणी, व्यक्ती यांच्या समूहाला दाखवण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो, त्या शब्दांना 'समुहदर्शक शब्द' (SAMUH DARSHAK SHABD) असे म्हणतात.
समूहदर्शक शब्द महत्व :
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, मुख्यत्वे 5 वी, 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, मंथन परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, CTET EXAM या परीक्षांमध्ये समुहदर्शक शब्द' (SAMUH DARSHAK SHABD) याबद्दल प्रश्न विचारलेले असतात. ( या पोस्टमध्ये आपण 100 पेक्षा जास्त शब्दांचा अभ्यास करणार आहोत, उर्वरीत शब्द लवकरच अपडेट करणार आहोत..)
हे ही वाचा : शब्दसमूहाबद्दल एक शब्द
समूहदर्शक शब्द
SAMUH DARSHAK SHABD
शब्द | समूहदर्शक शब्द |
---|---|
पक्ष्यांचा | थवा |
चाव्यांचा | जुडगा |
लोकांची | गर्दी |
आंब्याच्या झाडांची | आमराई |
धान्यांची | रास |
पुस्तकांचा | गठ्ठा, संच |
प्रश्नपत्रिकांचा | संच |
फुलांचा | गुच्छ |
फळांचा | ढीग |
बांबूचे | बेट |
उपकरणांचा | संच |
ऊसाची | मोळी |
करवंदाची | जाळी |
किल्यांचा | जुडगा |
गुरांचा | कळप |
जहाजांचा | काफिला |
दुर्वांची | जुडी |
द्राक्षांचा | घड, घोस |
प्रवाशांची | झुंबड |
तारकांचा | पुंज |
शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपयुक्त माहिती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, नोकरी व रोजगार, तसेच दररोज मराठी वर्तमानपत्र वाचण्यासाठी खालील ग्रुप जॉईन करा..
0 Comments