Ticker

6/recent/ticker-posts

शब्दसमूहाबद्दल एक शब्द | shabdasamuhabaddal ek shabda |

 
शब्दसमूहाबद्दल एक शब्द

Shabda samuhabaddal ek shabda : 

आज आपण 'शब्दसमूहाबद्दल एक शब्द' याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.500पेक्षाही जास्त शब्दांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत.

'शब्दसमुहाबद्दल एक शब्द' म्हणजे काय ?

आपण, बोलतांना किंवा लिहितांना अनेक शब्दांचा उपयोग करत असतो. अशा वेळी आपण कधी कधी काही ठराविक शब्द एकत्रित वापरतो. या शब्दांच्या समूहातून जो ठराविक अर्थ प्राप्त होतो. त्याच अर्थासाठी एक नवीन शब्द वापरतात त्यालाच 'शब्दसमूहाबद्दल एक शब्द '/ 'Shabda samuhabaddal ek shabda' असे म्हणतात.

आपणांस शब्दसमूहाबद्दल एक शब्द ( Shabda samuhabaddal ek shabda) या उदाहरणांचा शिष्यवृत्ती/ नवोदय किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी नक्कीच खूप उपयोग होईल.. (आणखी शब्द लवकरच अपडेट केले जातील. 

हे ही वाचा : नवीन शैक्षणिक धोरण 2020

हे ही वाचा : समानार्थी शब्द

हे ही वाचा : विरुद्धार्थी शब्द

              शब्दसमूहाबद्दल एक शब्द

Shabda samuhabaddal ek shabda  

शब्दसमूह शब्द 
हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आसेतुहिमाचल
देव आहे असे मानणारा आस्तिक 
देव नाही असे मानणारा नास्तिक 
अन्न देणारा अन्नदाता
कोणाचाही आधार नाही असा अनाथ
अपेक्षा नसताना अनपेक्षित 
अनुभव नसलेला अननुभवी
ज्याचा थांग लागत नाही असे अथांग
खूप दानधर्म करणारा दानशूर
जीवाला जीव देणारा जिवलग
जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासू 
दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा कनवाळू
देशासाठी झटणारा देशभक्त 
दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी
थोडक्यात समाधान मानणारा अल्पसंतुष्ट
सेवा करणारा सेवक
एकाच काळातील समकालीन
सत्यासाठी झगडणारा  सत्याग्रही 
स्वतःचे काम स्वतः करणारा स्वावलंबी 
देशासाठी प्राण अर्पण करणारा हुतात्मा 


हे ही वाचा : समानार्थी शब्द

शब्दसमुह शब्द
अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा अष्टावधानी 
अरण्याचा राजा वनराज
अरण्याची शोभा वनश्री
अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट अनपेक्षित
अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी 
आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी 
आग विझवणारे यंत्र अग्निशामक यंत्र
इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन वतन 
ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक
ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक
उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह धबधबा 
ऐकायला व बोलायला न येणारा मूकबधिर 
भाषण ऐकणारे श्रोते
अंग राखून काम करणारा अंगचोर
कथा सांगणारा कथेकरी 
कथा (गोष्ट) लिहिणारा कथालेखक,कथाकार
कल्पना नसताना आलेले संकट घाला
कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य
कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्यपराड:मुख 
कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा कर्तव्यदक्ष

Post a Comment

0 Comments