Ticker

6/recent/ticker-posts

विरुद्धार्थी शब्द | Virudharthi Shabd In Marathi | Opposite Words In Marathi |

मराठी विरुद्धार्थी शब्द




Virudharthi shabd in marathi : आज आपण 'विरुद्धार्थी शब्द मराठी' याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.1000 पेक्षाही जास्त विरुद्धार्थी शब्दांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. विरुद्धार्थी शब्दांना हिंदीमध्ये 'विलोम शब्द' तर इंग्रजीमध्ये 'antonyms word' किंवा ' opposite words' असे म्हणतात.

विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ? विरुद्धार्थी शब्द म्हणजे उलट अर्थाचे शब्द. एखाद्या शब्दाच्या विरुद्ध अर्थ असणाऱ्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.
उदा. 
लहान × मोठा, 
दिवस × रात्र,
जवळ × दूर,
नवा × जुना

विरुद्धार्थी शब्द कसे तयार होतात काही मराठी शब्दांच्या आधी ' अ, अन् , अव, अप, ना, नि, नी:, निर् , दु :, गैर, बे, बिन, पर, वि, सु, कु, इत्यादी काही ठराविक अक्षरे लागून विरुद्धार्थी शब्द तयार होतात. शब्दांच्या आधी लागणाऱ्या विशिष्ट अक्षरांना उपसर्ग म्हणतात. आता, आपण असे उपसर्ग लावून तयार होणारे विविध विरुद्धार्थी शब्द पाहूया.....

'अ' उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द 


शब्द विरुद्धार्थी शब्द
ज्ञान अज्ञान
कुशल अकुशल
चल अचल
तुलनिय अतुलनीय
दृश्य अदृश्य
नियमित अनियमित
नित्य अनित्य
नियंत्रित अनियंत्रित
निश्चित अनिश्चित
नीती अनिती
न्याय अन्याय
पराजित अपराजित
परिचित अपरिचित
पवित्र अपवित्र
पारदर्शक अपारदर्शक
पूर्ण अपूर्ण
पूर्णांक अपूर्णांक
प्रकट अप्रकट
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष
प्रमाण अप्रमाण
प्रसन्न अप्रसन्न
प्रशस्त अप्रशस्त
प्रसिध्द अप्रसिद्ध
प्रामाणिक अप्रामाणिक
प्रिय अप्रिय
मर्यादित अमर्यादित
मूर्त अमूर्त
यशस्वी अयशस्वी
योग्य अयोग्य
लिखित अलिखित
लौकिक अलौकिक
रसिक अरसिक
रुंद अरुंद
विकारी अविकारी
विचारी अविचारी
विभक्त अविभक्त
विवाहित अविवाहित
विवेकी अविवेकी
विस्मरणीय अविस्मरणीय
विश्वास अविश्वास
वैध अवैध
व्यवस्थित अव्यवस्थित
शक्य अशक्य
शाश्वत अशाश्वत
शांत अशांत
शुद्ध अशुद्ध
शुभ अशुभ
सभ्य असभ्य
समंजस असमंजस
समान असमान
समाधान असमाधान
सफल असफल
समर्थ असमर्थ
सहकार असहकार
सत्य असत्य
साध्य असाध्य
सामान्य असामान्य
साधारण असाधारण
स्पृश्य अस्पृश्य
सुर असुर
सुरक्षित असुरक्षित
संतुष्ट असंतुष्ट
संतोष असंतोष
स्थिर अस्थिर
स्पष्ट अस्पष्ट
स्वच्छ अस्वच्छ
स्वस्थ अस्वस्थ
हिंसा अहिंसा
ज्ञात अज्ञात
क्षय अक्षय
क्षम्य अक्षम्य
ज्ञानी अज्ञानी
शब्द  अन् उपसर्ग
आस्था अनास्था
आवश्यक अनावश्यक
अनुभवी अननुभवी
अवधान अनवधान
आदर अनादर
आरोग्य अनारोग्य
आवृत्त अनावृत्त
आसक्त अनासक्त
इच्छा अनिच्छा
उत्तीर्ण अनुत्तीर्ण
उदार अनुदार
औरस अनौरस 
शब्द ना उपसर्ग
बाद नाबाद
कबूल नाकबूल
खुश नाखुश
पसंत नापसंत
आवड नावड
आवडता नावडता
पास नापास
मर्द नामर्द
राजी नाराजी
लायक नालायक
इलाज नाइलाज
पास नापास 
शब्द नि, नी:, दु:
पापी निष्पाप
रोगी निरोगी
संदिग्ध निःसंदिग्ध
स्वार्थी निःस्वार्थी
अपराधी निरपराधी
आधार निराधार
आशा निराशा
उपाय निरुपाय
उपयोगी निरुपयोगी
उपद्रवी निरुपद्रवी
उत्साही निरुत्साही
लोभी निर्लोभी
व्यसनी निर्व्यसनी
धनवान निर्धन
लक्ष दुर्लक्ष
शब्द गैर, बे, अव
हजर गैरहजर
लागू गैरलागू
समज गैरसमज
सोय गैरसोय
शिस्त गैरशिस्त
शिस्त बेशिस्त
जबाबदार बेजबाबदार
कायदेशीर बेकायदेशीर
सावध बेसावध
सुरेल बेसूर
हिशेबी बेहिशेबी
इमानी बेइमान
पगारी बिनपगारी
चूक बिनचूक
कृपा अवकृपा
गुण  अवगुण
गुणी अवगुनी
मान अवमान
शब्द विरुद्धार्थी शब्द
सुगम दुर्गम
सचेतन अचेतन
सबला अबला
सकर्मक अकर्मक
सलग अलग
सशक्त अशक्त
सत्पात्र अपात्र
सज्ञान अज्ञान
सकारण अकारण
सदाचार अनाचार
सन्मान अपमान
सुशिक्षित अशिक्षित
सुसह्य असह्य
सुस्थिर अस्थिर
सुविचार कुविचार
सुपुत्र कुपुत्र
सुविख्यात कुविख्यात
सुसंगती कुसंगती
सुस्वरूप कुरूप
सजीव निर्जीव
सदय निर्दय
सुसंगत विसंगत
स्मरण विस्मरण
सुसंवाद विसंवाद
आकर्षक अनाकर्षक
सुगंध दुर्गंध
होकार नकार
सद्गुण दुर्गुण
सुबुद्धी दुर्बुद्धी
सुबोध दुर्बोध
सुरक्षित असुरक्षित
सुलभ दुर्लभ
सुदैवी दुर्दैवी
सत्कृत्य दुष्कृत्य
सुकर दुष्कर
सुयश अपयश
विजय पराजय
सुकाळ दुष्काळ
सुचिन्ह दुश्चिन्ह
सुवार्ता दुर्वार्ता
अतिवृष्टी अनावृष्टी
अत्यावश्यक अनावश्यक
उत्कर्ष अपकर्ष
उत्कृष्ट निकृष्ट
उपकार अपकार
शुभशकुन अपशकुन
स्वकीय परकीय
स्वतंत्र परतंत्र
स्वदेश परदेश
स्वातंत्र्य पारतंत्र्य
स्वाधीन पराधीन
स्वावलंबी परावलंबी
इहलौकिक पारलौकिक
उन्नती अवनती
सुलक्षणी अवलक्षणी
नशीबवान अनाकर्षक
शब्द विरुद्धार्थी शब्द
आत बाहेर
अनुरूप विजोड
अमृत विष
अलीकडे पलीकडे
अर्थपूर्ण निरर्थक
अध्ययन अध्यापन
अटक सुटका
अवघड सोपे
आठवणे विसरणे
आघाडी पिछाडी
आशीर्वाद शाप
आळशी उद्योगी
आकाश पाताळ
आनंद दुःख
आरंभ शेवट
आसक्ती विरक्ती
इकडे तिकडे
उदय अस्त
उत्कृष्ट निकृष्ट
उद्घाटन समारोप
उपकार अपकार
उपयोगी निरुपयोगी
उघड गुप्त/बंद
उच्च नीच
उताणा पालथा
उद्धट नम्र
उधळ्या कंजूष
उष्ण थंड/ शीतल
उंच ठेंगू/ बुटका
ऊन सावली
उलटा सावली
उलटा सुलटा
ओला कोरडा / सुका
अंधार उजेड
कठीण मऊ / कोमल
कठोर मृदू / कोमल
कडू गोड
कच्चा पक्का
कडक नरम
कृष्ण धवल
कृतज्ञ कृतघ्न
कृत्रिम नैसर्गिक
काळोख प्रकाश
काळा पांढरा /गोरा
कोवळे जून /राठ
कौतुक निंदा
खरे खोटे
खरेदीविक्री
खिन्न प्रसन्न / आनंदी
खोल उथळ
गच्च सैल / विरळ
गतकाल भविष्यकाल
गरीब श्रीमंत
गिऱ्हाईक विक्रेता
गुळगुळीत खडबडीत
गुरू शिष्य
ग्रामीण शहरी
ग्राह्य त्याज्य
घट्ट सैल
चपळ मंद
चढण उतरण
चांगले वाईट
चूक  बरोबर
चोर साव
जन्म मृत्यू
जळणे विझणे
जमा खर्च
जलद सावकाश
ज्येष्ठ कनिष्ठ
टंचाई विपुलता
टिकाऊ कमकुवत
तरुण म्हातारा
तारक मारक
ताजे शिळे
तीक्ष्ण बोथट
तेजी मंदी
पूर्व पश्चिम
प्रेम द्वेष
फुलणे कोमेजण
बरे वाईट
बलाढ्य किरकोळ
बलवान दुर्बल
बिंब प्रतिबिंब
बुध्दीमान मूर्ख
बोलका अबोल / मितभाषी
भरती ओहोटी
भक्कम कमकुवत
भव्य चिमुकले
भाग्यवान अभागी / दुर्भागी
मर्त्य अमर
मंजूळ कर्कश
मागचा पुढचा
मान अपमान
माथा पायथा
मालक नोकर
मित्र शत्रू
मृत जिवंत
मैत्री दुष्मनी / वैर
मोकळे बंदिस्त
मृदू कठीण / टणक
मंद जलद
रडू हसू
रागीट प्रेमळ
राजमार्ग आडमार्ग
तेजस्वी तेजहीन
थोर लहान
थोरला धाकटा
दाट विरळ
दिवस रात्र
दीर्घ ऱ्हस्व
दुरुस्त नादुरुस्त
दुष्ट सुष्ट
दुर जवळ
देव दानव/ दैत्य
देशभक्त देशद्रोही
दोष गुण
धीट भित्रा
धूर्त भोळा / मूर्ख
नफा तोटा
नवा जुना
नम्रता उद्धटपणा
नक्कल अस्सल
नशीबवान कमनशिबी
नाशवंत अविनाशी
निर्भय भित्रा
निर्मळ मळका
न्यूनता विपुलता
पहिला शेवटचा
पक्का कच्चा
प्रखर सौम्य
प्रचंड चिमुकले
प्रगती अधोगती
पाप पुण्य
पापी पुण्यवान
प्राचीन अर्वाचीन
प्रारंभ अखेर / शेवट
शहाणा मूर्ख / वेडा
वृध्द तरुण
वैयक्तिक सार्वजनिक
विक्षिप्त समंजस
वर वधू
वर खाली
वडिलार्जित स्वकष्टार्जित
लांब आखूड
लाभ तोटा / हानी
लघू विशाल / गुरू
लवकर सावकाश
रुचकर बेचव
रोख उधार
राव रंक
हुशार मठ्ठ
हार जीत
हर्ष खेद
हळू जलद
हसणे रडणे
स्वस्त महाग
स्वर्ग नरक / पाताळ
स्थूल सूक्ष्म
स्तुती निंदा
सौंदर्य कुरूपता
सूर्योदय सूर्यास्त
सुबक बेढब
सुंदर कुरूप
सुख दुःख
सुरेल कर्कश / भसाडा
सुरुवात शेवट
शाश्वत नश्वर / क्षणभंगुर
शीघ्र मंद
शूर / धाडसी भित्रा
शंका खात्री
सरळ वाकडे
समोर मागे
सज्जन दुर्जन
सवाल जवाब
सनातनी सुधारक
सरळ वाकडा
संशय खात्री
स्तुती निंदा
स्वस्त महाग
साम्य  भेद

Post a Comment

0 Comments