Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Jayanti Speech In Marathi |

               By: school companion team

शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :






महात्मा गांधी जयंती मराठी भाषण


अध्यक्ष महाशय, सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हांला महात्मा गांधी यांच्याबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती.

विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळीबाई असे होते. त्यांचे वडील त्याकाळी पोरबंदर संस्थानाचे दिवाण होते. त्यांच्या आई पुतळीबाई या खूप धार्मिक होत्या.त्या आपल्या मुलांना ध्रुव, प्रल्हाद, हरिश्चंद्र, श्रावणबाळ यांच्या वेगवेगळ्या धार्मिक गोष्टी सांगत.महात्मा गांधी स्वतः सुद्धा धार्मिक होते. त्यांना 'वैष्णव जन तो तेने कहिये' हे भजन खूप प्रिय होते.

मित्रांनो,महात्मा गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचा पुरस्कार केला. अहिंसात्मक चळवळ उभारून त्यांनी इंग्रजांना हा देश सोडून जाण्यास भाग पाडले. आणि म्हणूनच 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस देशभरात 'गांधी जयंती' म्हणून तर जगभरात 'जागतिक अहिंसा दिन' म्हणून साजरा केला जातो.

महात्मा गांधींनी भारतीयांना इंग्रजांच्या अन्यायी, अत्याचारी, जुलमी, सत्तेतून रक्ताचा एक थेंबही न सांडता सत्याग्रहाच्या व उपोषणाच्या मार्गाने मुक्त करून जगाला एक नवा क्रांतीचा मार्ग दाखवून दिला. परदेशात जाऊन वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते नोकरीनिमित्त बाहेर पडले. त्यांना इंग्रजांच्या अन्यायी जुलमी सत्तेची प्रचंड चीड आली. ते पुन्हा भारतात आले. परकीय सत्तेला देशातून हाकलून देण्यासाठी सत्य, अहिंसा, असहकार, सत्याग्रह व स्वदेशीचा वापर, उपोषण व हरताळ या सूत्रांनुसार त्यांनी इंग्रजांना देश सोडण्यास भाग पाडले. 'चले जाव' चळवळ, दांडी यात्रा, आमरण उपोषण इत्यादी गोष्टींचा त्यांनी इंग्रजविरुद्ध 'अस्त्र' म्हणून वापर केला.

महात्मा गांधींनी अस्पृश्यांना समानतेची वागणूक मिळावी म्हणून मानवतेची शिकवण देशवासियांना दिली. 30 जानेवारी 1948 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शांततेच्या मार्गाने लढा देणाऱ्या अशा या थोर महापुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम.

मित्रांनो,महात्मा गांधी यांच्या जीवनावरील निबंध/भाषण तुम्हांला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच कोणत्या विषयावरील निबंध तुम्हांला वाचायला आवडेल हेही सांगा





Post a Comment

0 Comments