Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक नारळ दिवस निबंध | essay on world coconut day |

                 By: school companion team

शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :



जागतिक नारळ दिवस

एशियन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी म्हणजेच APCC कडून नारळाचं महत्व आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी 2009 साली 2 सप्टेंबर हा जागतिक नारळ दिवस म्हणून जाहीर करण्यात आला. तेव्हापासून जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहाने 'जागतिक नारळ दिवस' (WORLD COCONUT DAY) म्हणून साजरा केला जातो.आज, यानिमित्ताने आपण नारळ या फळाविषयी अधिक माहिती घेऊया.

 मुलांनो, मलेशिया नावाचा देश आहे.खूप वर्षांपूर्वी 16 व्या शतकात काही पोर्तुगीज नावाडी फिरत फिरत या देशात पोहोचले.समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारत असताना त्यांना एक गोल फळ दिसले.आतापर्यंत त्यांनी असे फळ कधीच पाहिलेले नसते.त्यांना आश्चर्य वाटते. ते त्या फळाच्या जवळ जातात आणि निरखून पाहू लागतात. त्यांना त्या फळाला असणारे तीन डोळे माणसाच्या दोन डोळे व एका नाकासारखे वाटतात.त्या नावाड्यांना ते फळ आपल्याकडे बघून हसत आहे असे वाटले. त्यामुळे त्यांनी त्या फळाला कोको असे नाव दिले.'कोको' या शब्दाचा अर्थ 'हसरा चेहरा' असा होतो. पुढे हे फळ इंग्लंडमध्ये गेले.इंग्लंडमधील लोकांनी हे फळ पाहिले. त्याच्यावर असेलेल्या कठीण कवचामुळे त्यांनी 'कोको' या शब्दापुढे 'नट' हा शब्द जोडला. त्यानंतरच्या काळात सगकीकडेच या फळाला 'कोकोनट' असे नाव पडले. तर कोकोनट या नावामागे ही अशी आश्चर्यकारक गोष्ट सांगितली जाते.

नारळाचे झाड उंच असते.नारळाच्या झाडाला 'माड' असेही म्हटले जाते. झाडाला एकही फांदी नसते.वरील टोकाकडे लांबलचक पानांचा झुपका दिसतो. त्या पानांना झावळ्या म्हणतात. झावळीच्या खाचेत नारळ लटकलेले असतात.माडाचे खोड गोलाकार, पांढरट, तपकिरी रंगाचे असतात.

मुलांनो, नारळाचे झाड अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असते. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा (भागाचा) आपल्याला काहीतरी उपयोग होतो. नारळाच्या झाडाचा कोणताही भाग वाया जात नाही.

नारळाच्या झाडापासून आपल्याला नारळ मिळते.नारळापासून आपल्याला पाणी, खोबरे, दूध,साय, तेल इत्यादी गोष्टी मिळतातच, शिवाय अनेक खाद्यपदार्थ तयार करतानाही नारळाचा उपयोग होतो. नारळाची पाने म्हणजेच झावळयांपासून झाडू, खराटा, टोपली, घराचे छत, चटई, दोरखंड इत्यादी वस्तू बनवता येतात. नारळाच्या खोडापासून फर्निचर, शोभेच्या वस्तू बनवता येतात. नारळाच्या करवंटीचा उपयोग शेकोटी/चुलीतील इंधन म्हणून करता येतो. करवंटीपासून वेगवेगळे वाद्य तयार करतात. या सर्व कारणांमुळेच नारळाच्या झाडाला मनातील इच्छा पूर्ण करणारा या अर्थाने 'कल्पतरू' किंवा 'कल्पवृक्ष' असे म्हणतात.

 मुलांनो, आता जाणून घेऊयात नारळाबद्दल काही मनोरंजक गोष्टी-

1.नारळ समुद्रात कितीही दूरपर्यंत तरंगत जाऊ शकते. 

          

 2.नारळ तोडण्यासाठी काही देशांत माकडांना प्रशिक्षित केले जाते. प्रशिक्षणानंतर माकडे झाडावर चढतात. नारळ तोडून जमिनीवर टाकतात .                                                          

 3.नारळाचा उपयोग धार्मिक विधी, पूजा-अर्चा मध्ये केला जातो. एखाद्याचा सन्मान करण्यासाठीही नारळ भेट म्हणून देतात. म्हणूनच नारळाला 'श्रीफळ' असेही म्हटले जाते. 


हे ही वाचा : गोपाळकाला म्हणजे काय? का साजरा केला जातो गोपाळकाला?


  




Post a Comment

0 Comments