केंद्रप्रमुख भरती विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 अभ्यासासाठी संदर्भ पुस्तके | Kendra Pramukh Bharati 2023 syllabus book |
June 09, 2023
केंद्रप्रमुख विभागीय भरती 2023 :
केंद्रप्रमुख 2384 पदांची जाहिरात प्रसिद्ध, शिक्षकांना 15 जून 2023 पर्यंत अर्ज करता येणार ; परीक्षा ऑनलाइन व नवीन अभ्यासक्रमानुसार होणार:
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना 2384 रिक्त केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धापरीद्वारे नियुक्ती देण्यासाठी "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३" या परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयात आयोजन करण्यात आले आहे.
अर्ज करण्याची मुदत :
ऑनलाईन प्रणालीव्दारे दि. 6 जून 2023 ते 15 जून 2023 या कालावधीत अर्ज करता येतील.
विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम / बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
किंवा
प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरीलप्रमाणे पदवीधारण केलेली आहे, त्या दिनांकापासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. "
केंद्र प्रमुख विभागीय परीक्षेच्या नवीन 200 गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी :
केंद्रप्रमुख पदासाठी 200 गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.
पेपर एक 100 प्रश्न 100 गुण
पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.
पेपर क्रमांक एकमध्ये बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.केंद्र प्रमुख परीक्षेच्या दोन्ही पेपरचे नवीन अभ्यासक्रमाचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.
पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता
बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
केंद्र प्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ :
1. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक व शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स (दुसरी आवृत्ती)
2. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण तयारी - के सागर (चौथी आवृत्ती)
3.संपूर्ण शिक्षक अभियोग्यता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (नववी आवृत्ती)
4. शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे (दुसरी आवृत्ती)
पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह
1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण
2. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण
3.माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण
4 अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण
5 माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण
6 वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण
7 संप्रेषण कौशल्य - 15 गुण
एकूण - 100 गुण
केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ :
१.केंद्रप्रमुख परीक्षा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे (तिसरी आवृत्ती) सदर पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.
तसेच केंद्र प्रमुख परीक्षा पेपर दोनच्या अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
1.केंद्रप्रमुख पेपर 2 व शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षणशास्त्र तांत्रिक ज्ञान घटकनिहाय वस्तुनिष्ठ प्रश्न - स्वाती शेटे (नवीन अभ्यासक्रमानुसार) के सागर पब्लिकेशन्स
2.शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र- डॉ.ह.ना.जगताप,नित्यनूतन प्रकाशन (पाचवी आवृत्ती)
3.संपुर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संपुर्ण विवेचन व वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते(नववी आवृत्ती)
5 .शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह- डॉ.ह.ना.जगताप
6.शिक्षणातील नवविचारप्रवाह - डॉ.नीलिमा सप्रे, फडके प्रकाशन
7.शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.
याबाबतच्या अधिक माहितीसाठी,नोकरी व रोजगाराच्या संधी, दररोजचे वृत्तपत्र, शैक्षणीक घडामोडी, शिष्यवृत्ती सराव, स्पर्धा परीक्षा इत्यादींबाबत जाणून घेण्यासाठी व्हॉट्सॲप समूहात सामील व्हा..
0 Comments