10वी /12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्रासाठी अर्ज प्रक्रिया; Rechecking,Revaluation Form 2023 aplication :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर आज रोजी,गुरुवार दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आलेला आहे.
मात्र, अशा परिस्थितीत काही विद्यार्थ्यांना आपल्या निकलाविषयी साशंकता असते. मिळालेले गुण कमी आहेत किंवा आपला पेपर व्यवस्थित तपासला नाही, असे त्यांना वाटत असते. अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्रासाठी अर्ज प्रक्रिया; Rechecking,Revaluation Form 2023 aplication ही सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिली जाते.
HSC / SSC EXAM PEPAR Rechecking,Revaluation Form 2023 aplication कसे करायचे :
(१) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत. पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
3 )यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
4) गुणपडताळणीसाठी शुक्रवार, दिनांक २६/०५/२०२३ ते सोमवार, दिनांक ०५/०६/२०२३ पर्यंत मुदत आहे. गुणपडताळणीसाठी ५ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय रू. ५०/- इतके शुल्क ऑनलाईन पध्दतीने मंडळाकडे जमा करावे लागेल.
5) छायाप्रतीसाठी शुक्रवार, दिनांक २६/०५/२०२३ ते बुधवार, दिनांक १४/०६/ २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. फोटोकॉपीसाठी प्रति विषय ४०० रुपये इतके शुल्क ऑनलाईन पध्दतीनेकडे जमा करावे लागेल.
6) त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card/ UPI Net Banking) याद्वारे भरता येईल.
7) फेब्रुवारी-मार्च २०२३ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील.
8)ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
9) फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणान्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.
10) जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये आयोजित करण्यात येणान्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्याथ्यांसाठी सोमवार दिनांक २९/०५/२०१३ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.
11 ) फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत सोमवार दि.०५/०६/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता वितरित करण्यात येतील.
याबाबतच्या अधिक माहितीसाठी,नोकरी व रोजगाराच्या संधी, दररोजचे वृत्तपत्र, शैक्षणीक घडामोडी, शिष्यवृत्ती सराव, स्पर्धा परीक्षा इत्यादींबाबत जाणून घेण्यासाठी व्हॉट्सॲप समूहात सामील व्हा..
0 Comments