आज, बारावीचा निकाल ! दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर होणार !
सालाबादप्रमाने, यावर्षीही मुलांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे दहावी, बारावीच्या परीक्षा (SSC EXAM 2023 आणि HSC EXAM 2023 ) फेब्रुवारी व मार्च महिन्यात पार पडल्या.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत घेण्यात आली. तसेच दहावीची परीक्षा दोन मार्च ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. सर्वच मुले व पालकही या परीक्षेबाबत अतिशय गंभीर असतात. कारण या परीक्षेतील गुणांवरच अनेक ठिकाणी प्रवेश हा निश्चित केला जात असतो. आणि म्हणूनच सर्वांना उत्सुकता आहे की, बारावीचा निकाल (MAHARASHTRA STATE BOARD RESULT 2023 ) कधी लागणार ?
12 वी चा निकाल आज दुपारी 12 वाजता :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून जाहीर प्रकटन खालीलप्रमाणे :
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या निकालाबाबत मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर गुरुवार दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
वेबसाईट क्र. | वेबसाईट |
---|---|
वेबसाईट क्र.1 | https://www.mahahsscboard.in/ |
वेबसाईट क्र.2 | https://mahresult.nic.in/ |
वेबसाईट क्र.3 | http://hscresult.mkcl.org/ |
वेबसाईट क्र.4 | http://mahresults.org.in/ |
वेबसाईट क्र.5 | www.schoolcompanion.in/ |
0 Comments