Ticker

6/recent/ticker-posts

राजमाता जिजाबाई भोसले भाषण | Jijamata Information in marathi |

 

               By: school companion team

शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :



राजमाता जिजाबाई भोसले भाषण


नमस्कार मित्रांनो, आज आपण राजमाता जिजाबाई भोसले यांच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या माहितीच्या आधारे तुम्ही 'राजमाता जिजाबाई भोसले मराठी निबंध' किंवा राजमाता जिजाबाई भोसले मराठी भाषण' लिहू शकता,अशी खात्री वाटते.

आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही.जन्माला आलेल्या बाळाचा जगातला पहिला गुरू म्हणजे आई. आई प्रसंगी वज्रासारखी कठोर होऊन तर कधी सायीहुन मऊ होऊन मुलाला घडवते. आईचे मन हे अथांग समुद्रासारखे असते.

                   आई एक नाव असतं,                                                घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं.

शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वात जिजाबाईचा मोलाचा वाटा आहे.जिजाऊ ही सिंधखेडच्या लखुजी जाधवांची लाडकी मुलगी होती. जिजाऊचा जन्म 12 जानेवारी ई.स.1598 रोजी झाला. जिजाऊंच्या आईचे नाव म्हाळसाबाई  होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. लहानपणी जिजाऊ अधूनमधून केव्हातरी दरबारात जात असे. आपल्या वडिलांना नाना प्रश्न विचारून भंडावून सोडत असे. जिजाऊ लहानपणी घोड्यावर बसणे, अचूक नेमबाजी करणे यांत तरबेज होती. जिजाऊ अत्यंत बुद्धिमानी, व सुस्वभावी होती. तिला रामायण, महाभारताची अत्यंत आवड होती.

द्रौपदी, कुंती, विदुला यांच्या सारख्या वीरांगणाची चरित्रे जिजाऊने लहानपणीच ऐकले होते.या चरित्रांचा या लहान मुलीवर फार मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे कोणत्याही संकटाचा सामना करण्याचे धैर्य, हिम्मत तिच्यामध्ये निर्माण झाली होती. 

ई.स. 1605 साली, लहान वयातच जिजाऊचे लग्न शहाजीराजांशी दौलताबाद येथे झाले. महाराष्ट्रात असलेल्या ओसाड वाळवंट 'पुनवडीत' तिने सोन्याच्या फाळाने जमीन नांगरून भावी स्वराज्याच्या वैभवाची बीजे रोवली. परमेश्वर कृपेने भीम किंवा अर्जुनासारखा पुत्र व्हावा असे तिला वाटे, ती नेहमी जगदंबेला (तुळजापूरची भवानी) प्रार्थना करत असे. परकीयांच्या चाकरीत धन्यता मानणाऱ्या मराठ्यांची दिन वृत्ती नष्ट होऊ दे. 'स्वतःचा किर्तीध्वज वाढवणारा व स्वतःचे सैन्य बाळगणारा पराक्रमी व स्वतंत्र राजा मला पाहू दे' अशी जगदंबेला प्रार्थना करणारी जिजाऊ होती.

शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यावर त्यांच्या शिक्षणाकडे जिजाऊने पूर्ण लक्ष दिले.जिजाऊ म्हणजे शिवरायांच्या माथ्यावरती कल्पतरुची छाया होती. ज्या शिवरायांनी महाराष्ट्र घडवीला त्या शिवरायांना या महान स्त्रीने घडविले. जिजाऊ शिवबाला लहान वयातच उपदेश देत असत- "शिवबा भोसल्यांचे पूर्वज श्रीरामचंद्र !रामाने दुष्ट रावणाला ठार मारले आणि प्रजेला सुखी केले.जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण त्याने दुष्ट कंसाला ठार मारले आणि प्रजेला सुखी केले.असे तुसुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील, तू सुद्धा गरीब लोकांना सुखी करू शकशील.आईच्या उपदेशाने शिवरायांना हुरूप येई.

जिजाबाईंनी शिवबाच्या मनात स्वधर्म, स्वदेशभावना, स्वातंत्र्यप्रेम, देशाभिमान जागृत केला. जिजाऊंनी कडक शिस्त व न्यायनिष्ठुरता यांचे बाळकडू शिवबास पाजले. शिवाबावर अनेक संकटे आले, पण जिजाऊंनी धैर्य दिले.आपल्या पुत्राचा पराक्रम त्यांनी पाहिला. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा अभूतपूर्व असा राज्याभिषेकाचा सोहळा जिजाऊंनी पाहिला आणि तृप्त मनाने राज्यभिषेकानंतर अवघ्या अकरा दिवसानंतर दि.17 जून 1674 रोजी त्या देहमुक्त झाल्या.

सोडवा : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा

Post a Comment

0 Comments