By: school companion team
शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :
नमस्कार मित्रांनो, भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका, थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्मदिवस. मुलींना, स्रियांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जन्मदिवस 'बालिका दिन' म्हणूनही साजरा केला जातो.
आज, आपण सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त घोषवाक्ये व बालिका दिनानिमित्त देता येतील अशा काही घोषणा पाहणार आहोत. त्या तुम्ही लिहून घेऊ शकता.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त घोषवाक्ये
1. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा.... विजय असो.
2. पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुलेंचा....विजय असो.
3. दीन, दलितांची माऊली सावित्रीबाई फुलेंचा....विजय असो.
4. ज्ञानाची ज्योती सावित्रीबाई फुलेंचा...विजय असो.
5. स्रियांच्या शिक्षणाची सावित्री तूच खरी कैवारी...तुझ्यामुळेच आज शिकते आहे प्रत्येक नारी.
6. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार...तीच सावित्री आज जगाची शिलेदार.
बालिका दिनानिमित्त घोषवाक्ये
1.मुलगा, मुलगी समान... दोघांनाही द्यावे शिक्षण छान.
2.मुलगी वाचवा.....देश वाचवा.
3.मुलगी वाचवा....मुलगी शिकवा.
4.मुलापेक्षा मुलगी बरी....प्रकाश देते दोन्ही घरी.
5.लेक वाचवा...लेक शिकवा.
6.मुलीला समजू नका भार...तीच आहे तुमच्या जीवनाचा आधार.
0 Comments