Ticker

6/recent/ticker-posts

चाचा नेहरू कविता,पंडित नेहरू मराठी कविता , pandit javaharlal neharu kavita .

    

                 By: school companion team

शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :



नमस्कार ! पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. एक थोर स्वातंत्र्यसेनानी व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे. त्यांना मुले खूप आवडायची. मुले त्यांना 'चाचा नेहरू' अशा नावाने हाक मारायचे ! पंडित नेहरूंचा जन्मदिवस देशभरात 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो.  सादर करीत आहोत, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित एक मराठी कविता.

        

           चाचा नेहरू

बाल-गोपाळांना आवडणारे एकच नाव,
चाचा नेहरू असे त्यांचे नाव!


अवघ्या देशवासियांना सोबत घेत,
संकटांशी निडरपणे सामना केला.
अवघे जीवन अर्पण करीत,
फिरंग्यांशी लढा दिला.


गुलाबाचे फुल त्यांना प्रिय होते,
सदैव हसरा चेहरा सोबतीला.
मुलांशी जपायचे हळुवार नाते,
खूप सारे प्रेम नेहमीच दिमतीला.

चाचा तुम्ही आज नाहीत आमच्यासोबत,
पण,तुमचे विचार नक्कीच आहेत वंदनीय!
आम्ही मुले आहोत एकमेकांसोबत,
तुमच्या स्वप्नांतला भारत हेच आमचे ध्येय!


बाल-गोपाळांना आवडणारे एकच नाव,
चाचा नेहरू असे त्यांचे नाव.
                     
                    -पिनेश जाधव.

हे ही वाचा : पंडित नेहरू नाट्यछटा, चाचा नेहरू एकपात्री.


हे ही वाचा : चाचा नेहरूंना पत्र



                  

Post a Comment

0 Comments