Ticker

6/recent/ticker-posts

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय शासन निर्णय 2022-23

 

                By: school companion team


शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :




 





प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सन 2022 -23 या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करणारा शासन निर्णय दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. जर तुम्हाला 2022 या वर्षात तुमच्या पाल्याचा शाळेत प्रवेश निश्चित करायचा असेल तर हा 'शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करणारा शासन निर्णय' तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. 

हे ही वाचा : शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय शासन निर्णय सन 2021 -22

१८/०९/२०२० च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यातील जन्म असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अडचणी निर्माण होत आहे. म्हणून मानिव दिनांक बदलामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ साठी किमान वयोमर्यादा माहे ३१ डिसेंबर २०२२ अखेर पुढील प्रमाणे वय असणे आवश्यक आहे.

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय शासन निर्णय 2022-23


पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे, किती वर्षासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यायचे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश घ्यावा हे सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे. शाळांनी पूर्व प्राथमिक साठी कमी-जास्त वयाचे कारण देवून प्रवेश नाकारणे अपेक्षित नाही. सदरील शासन निर्णय दिनांक १८/०९/२०२० मुख्यतः इयत्ता १ ली मध्ये प्रवेशासाठी लागू आहे. शासनाने उक्त शासन निर्णयानुसार किमान वयोमर्यादा निश्चित करून दिलेली आहे. कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. कमाल वयोमर्यादेमध्ये लवचिकता ठेवण्यास हरकत नाही. 

या शासन निर्णयानुसार आपल्या काय लक्षात येते ? 

जर तुम्हाला तुमच्या पाल्याचा प्रवेश 2022 या वर्षात इयत्ता 1ली मध्ये जून महिन्यात (शाळा सुरू होतात) करावयाचा असल्यास तुमच्या पाल्याला  31 डिसेंबर 2022 ला तरी किमान 6 वर्ष पूर्ण झालेले असले पाहिजे. त्यापेक्षा जास्त असेल तरी  चालेल. यावरून असेही लक्षात येते की चालू वर्षी (2022) इयत्ता 1लीत अशी बालके प्रवेश घेऊ शकतात ज्यांचा जन्म 1ऑक्टोबर 2015 ते 31डिसेंबर 2016 यांच्या दरम्यान झालेला आहे. 


वाचा : सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय शासन निर्णय. तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोडसुद्धा करू शकता.



Post a Comment

0 Comments