Ticker

6/recent/ticker-posts

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय शासन निर्णय 2021-22

                 By: school companion team


शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :



 






------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अगोदरचा शासन निर्णय (पार्श्वभूमी)

शासनाने दि. ११ जून २०१० च्या शासन निर्णयान्वये शाळा प्रवेशाबाबतची कार्यपध्दती निश्चित केलेली आहे. सदर शासन निर्णयात प्रवेशाबाबतच्या इतर तरतूदीबरोबरच शाळा प्रवेशासाठी बालकाचे वयाबाबतची तरतूद आहे. सदर तरतुदीनुसार इयत्ता १ ली मधील प्रवेशासाठीची वयोमर्यादा ६ वर्षे निश्चित केलेली होती. तथापि, ५ वर्षे पूर्ण झालेले बालक इयत्ता १ ली मधील प्रवेशासाठी पात्र राहतील, असे आदेशात नमूद केले होते. 

राज्यात राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळा, सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई., आय.बी. अशा विविध प्रकारच्या शाळा आहेत. सदर सर्व प्रकारच्या शाळामध्ये प्रवेशाच्या वेळेस इयत्ता १ ली साठी वेगवेगळी वयोमर्यादा वेगवेगळ्या दिनांकास ग्राह्य धरून प्रवेश दिले जात होते. तसेच पूर्व प्राथमिकसाठी वर्गातील प्रवेशासाठी निश्चित अशी वयाची अट अस्तित्वात नव्हती. या बाबी विचारात घेऊन यामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक) याच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. 


सदर समितीने दिलेल्या शिफारशीनुसार शासन निर्णय दिनांक २२/०१/२०१५ व दि. २३/०१/२०१५ च्या शुध्दीपत्रकान्वये ३१ जुलै हा मानिव दिनाक गृहीत धरून बालकाचे किमान वय पूर्व प्राथमिक (इयत्ता १ ली पूर्वीचा ३ रा वर्ग) प्ले ग्रुप नर्सरीसाठी) साठी ३ वर्षे पूर्ण व इयत्ता १ ली साठी ६ वर्षे पूर्ण असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.


शासन निर्णय दि.२५/०१/२०१७ अन्वये शाळा प्रवेशासाठी ३० सप्टेंबर हा मानिव दिनांक घोषित करण्यात आलेला आहे. तसेच शासन निर्णय दि. २५/०७/२०१९ अन्वये शाळा प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये जास्तीत जास्त १५ दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.
शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि. १८/०२/२०२० रोजीच्या पत्रान्वये बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता आणण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास अनुसरुन शाळा प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबतचा शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे.

सन 2021 -22 बाबतचा शासन निर्णय

हे ही वाचा : शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय सन 2022-23 शासन निर्णय

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय शासन निर्णय 2021-22


नवीन शासन निर्णयाचा अर्थ काय ?

सामान्यपणे शाळा जूनमध्ये सुरू होतात. त्यावेळी पालक नर्सरी किंवा इयत्ता पहिलीमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घेत असतात.त्यावेळी बालकाला अनुक्रमे 3वर्षे आणि 6 वर्षे पूर्ण झालेली असावीत, नसेल तर त्यावर्षीच्या 31 सप्टेंबर पर्यंततरी ते पूर्ण होत असावेत असा याअगोदर नियम होता. अर्थात त्यात पुन्हा आणखी पुढे 15 दिवसाची मुदत देण्यात आली होती.म्हणजेच 31 सप्टेंबर ऐवजी 15 ऑक्टोबर पर्यंत तरी 6 वर्षे पूर्ण व्हायला हवीत.


पण, तरी सुद्धा अगदी काही दिवसांच्या फरकाने बरीच बालके प्रवेशापासून वंचित राहत होते. त्यांचे एक वर्षे वाया जात होते. आणी म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. चालू वर्षी 2021-22 मध्ये एखाद्या बालकाला अगदी 31 डिसेंबर2020 रोजी जरी अनुक्रमे 3 व 6 वर्षे पूर्ण होणार असले तरीसुद्धा असे बालक जूनमध्ये अनुक्रमे नर्सरी आणि पहिलीत प्रवेश घेऊ शकते.
(कृपया आपले मत कमेंटमध्ये नोंदवा.)

हा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा


--------------------------------------------------------------------


शासननिर्णयाबद्दल अधिक सखोल जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ बघा.

Post a Comment

0 Comments