Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षक दिन मराठी निबंध व भाषण| Essay and speech on Teacher's day |

                  By: school companion team

शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :




शिक्षक दिन निबंध व भाषण




                       शिक्षक दिन

               गुरू ब्रह्म गुरुरविष्णु | गुरू देव महेश्वर:|                                 गुरू साक्षात परब्रह्म | तैस्मय श्री गुरुवे नम:|

या श्लोकामध्ये गुरुबद्दलची महती वर्णन केली आहे. गुरू हाच साक्षात ब्रह्म आहे.गुरूला थेट देवाची उपमा यामध्ये दिली आहे. असे म्हटले जाते की आई वडिलांनंतर आपल्या आयुष्यात शिक्षक हेच सर्वांत महत्त्वाचे गुरू असतात. आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून गुरू-शिष्य परंपरा अस्तित्वात आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या शिक्षकांना खूप महत्वाचे स्थान असते. समाज, राष्ट्र उभारणीच्या कामात शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असते. आपल्या देशाला अशी भूमिका निभावणारे अनेक शिक्षक लाभले आहेत. पण ज्यांनी आपले तन, मन, धन, आपले उभे आयुष्यच शिक्षणाला वाहून घेतले  असे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन !

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 साली तामिळनाडूमधील तिरुत्तनी गावी झाला. त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी, शिक्षकांचे समाजातील महत्वपूर्ण स्थान अधोरेखित करण्यासाठी, आदर्श शिक्षकांना सन्मान देण्यासाठी सन 1962 पासून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो.

 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे लहानपणासूनच खूप अभ्यासू होते.शाळेत नेहमीच ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत असत.आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेजात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून शिक्षकीपेशाने जीवनाची सुरुवात केली. त्यांचे शिकवणेही अतीशय उच्च दर्जाचे होते. त्यांनी तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून जगभर नावलौकिक मिळवला. त्यानंतर त्यांनी ऑक्सफोर्ड, म्हैसूर यांसारख्या नावाजलेल्या विद्यापीठात अध्यापन केले.

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर या दोन्ही कालखंडात आपल्या देशाच्या जडणघडणीत त्यांचे विशेष योगदान लाभले आहे. 1931 ते 1939 पर्यंत ते राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्यांनी 1949 ते 1952 या कालखंडात रशियातील राजदूत म्हणून उत्तम कामगिरी निभावली. यादरम्यान त्यांनी भारत-रशिया मैत्रीचा पाया दृढ केला. आपल्या असामान्य कामगिरीच्या जोरावर 1952 साली ते भारताच्या उपराष्ट्रपती पदावर व 1962 साली भारताच्या राष्ट्रपती या अत्युच्च पदावर विराजमान झाले. एव्हढेच नाही तर स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचे ते अध्यक्षही होते.

भारतासह जगभरातील सर्व शिक्षक तत्वज्ञांचे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आदर्श स्फूर्तिस्थान आहेत.स्वामी विवेकानंदांनंतर भारतीय संस्कृतीची पताका सातासमुद्रापलीकडे फडकणारे ते भारत देशाचे महान सुपुत्र आहेत. हिंदू संस्कृतीचा महिमा सांगणारा त्यांचा 'इंडियन फिलॉसॉफी' हा ग्रंथ एक महत्वाचा दस्तऐवज आहे. त्यांनी तरुणांना 'जागृत व्हा, उठा' असा संदेश दिला. त्यांच्या याच अतुलनीय कार्यामुळे त्यांना डॉक्टरेट, डी.लिट., भारत रत्न यांसारखे सर्वोच्च पुरस्कार मिळाले.

देशभक्त,आदर्श शिक्षक, थोर तत्वज्ञ डॉ. राधाकृष्णन यांचे 17 एप्रिल 1975 रोजी मद्रास येथे निधन झाले. आजच्या या शिक्षकदिनी त्यांनी सांगितलेल्या वाटेवर चालण्याची शपथ घेऊया. आजच्या या शिक्षकदिनी शिक्षणमहर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना विनम्र अभिवादन !

हे ही वाचा : गुरुपौर्णिमा माहिती| गुरूपौर्णिमा निबंध |


Post a Comment

0 Comments