By: school companion team
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संयुक्त राष्ट्राच्या घोषणेनंतर सन 2015 पासून 21 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.या दिवशी सर्व जगामधील लोकं योगा करून हा दिवस साजरा करतात. या दिवशी जगभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण असते. योगामुळे योग्य शारीरिक आणि मानसिक बदल घडून येतात.
इतिहास :
आपल्या भारत देश हाच योगाचं उगमस्थान आहे. प्राचीन काळ म्हणजे अगदी पाच हजार वर्षापूर्वीही आपल्या देशात योग केला जात होता, असे म्हणतात. योगाचा उल्लेख आपल्या येथील नारदीय सूक्त आणि आपला प्राचीन ग्रंथ ऋग्वेदामध्येही आढळतो. प्राचीन काळातील अनेक संत, ऋषीमुनी, तपस्वी योग करत असत असा उल्लेख विविध ग्रंथामध्ये आढळतो. भगवद गीता आणि महाभारत या महाकाव्यामध्येही योगाचा उल्लेख आढळतो. पतंजली मुनी यांनी योगसुत्रे सांगितले आहेत.त्यांनी 'पातंजल योग सुत्र' नावाचा ग्रंथ लिहिला.महर्षी पंतजली मुनी यांना 'योगपिता' असे म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या ग्रंथात योगाबद्दल सविस्तर लिहिले आहे. योग प्रक्रिया समजून सांगितली आहे. योगाचे मानवी जीवनातील महत्व अधोरेखित केले आहेत. तर अशा प्रकारे योगाची उत्पत्ती ही पूर्णतः भारतात आहे, हे लक्षात येते.
जागतिक योग दिन 21 जून :
जागतिक योग दिन दरवर्षी 21 जुनलाच का साजरा केला जातो ? मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2014 साली संयुक्त राष्ट्राच्या महासभेत एक प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावामध्ये त्यांनी 'दरवर्षी जगामध्ये 21 जून हा दिवस 'आंतराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा' अशी मागणी केली. त्यांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या महासभेत चर्चा झाली. 193 देशांनी त्यात भाग घेतला. आणि 175 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. त्यांनी मान्य केले की योगाचे मानवी जीवनातील स्थान महत्वाचे ठरू शकते. आणि शेवटी, सर्वांचे मत विचारात घेऊन डिसेंबर 2014 ला संयुक्त राष्ट्राने या योगदिनाला मान्यता दिली. पुढील वर्षी 21 जून 2015 ला पहिला 'जागतिक योग दिन' साजरा करण्यात आला. जागतिक योग दिन म्हणून 21 जून याच दिवसाची निवड का केली ? 21 जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं. या दिवशी दिवस खूप मोठा असतो व रात्र ही खूप छोटी असते. योगा हा सकाळी लवकर उठून करावा असे मत असल्यानेही 21 जून या दिवसाला महत्व प्राप्त झाले.
योगाचे महत्व :
वर, सांगितल्याप्रमाणे प्राचीन काळापासूनच योगाचे महत्व विशद करण्यात आले आहे. सध्याच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या, वेगवान जीवनशैलीमुळे मानवी जीवनात अनेक प्रकारच्या गुंतागुंती झाल्या आहेत. अनेक लहानमोठ्या तब्येतीच्या कुरबुरी माणसाला भेडसावत आहेत. आहाराच्या उलटसुलट सवयीमुळे शारिरीक संतुलन बिघडले आणि त्यापाठोपाठ मानसिकही ! शरीर आणि मन हे परस्पर पूरक आहेत. शरीर स्वस्थ तर मन स्वस्थ ! असे म्हटले जाते. आणि म्हणूनच योगाचे महत्व अधोरेखित होते. योगा आपल्या शरीराबरोबरच मनाचेही स्वास्थ टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. विशेष म्हणजे लहान मुलापासून, तरुण ,प्रौढ, वृद्ध, आजारी, निरोगी असा कोणताही व्यक्ती योगाभ्यास करू शकतो. योगामुळे आपले शरीर सुदृढ होते, आपल्या शारीरिक क्षमता वाढतात. योगामुळे आपले मानसिक स्वास्थ्यही चांगले राहण्यास मदत होते. चला तर मग योगा करूया, आणि उत्साहपूर्ण आणि आरोग्यमयी जीवन जगुया !
योगाभ्यास करण्यासाठी खालील पुस्तके उपयुक्त ठरतील. DOWNLOAD या बटनावर क्लिक करून पुस्तक डाउनलोड करा.
पुस्तकाचे नाव | पुस्तक डाउनलोड करा |
आंतरराष्ट्रीय योग दिवस पुस्तक-भारत सरकार | DOWNLOAD |
मुलांसाठी योगासने पुस्तक -हिंदी | DOWNLOAD |
मुलांसाठी योगासने पुस्तक -मराठी | DOWNLOAD |
0 Comments