Ticker

6/recent/ticker-posts

मोफत ऑनलाईन कोर्सेस वेबसाईट | free online courses with certificates |

सध्या, संपूर्ण जग कोविड 19 च्या विषाणूविरुद्ध लढत आहे. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले जात आहेत. सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाऊन यांसारखे उपाय योजले जात आहेत. या परिस्थितीत शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागत आहे.अशा परिस्थितीत विद्यार्थी, तरुणवर्ग किंवा नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा असलेली कोणतीही व्यक्ती  मिळालेल्या या जास्तीच्या वेळेचा नक्कीच सदुपयोग करू शकतो.
आणि या सर्वांसाठी पर्याय आहे मोफत ऑनलाईन कोर्सेस वेबसाईट यांचा.


           Free online courses with certificates अशी ओळख सांगणाऱ्या आंतरजालावरील या वेबसाईट म्हणजे ज्ञान आणि कौशल्यांचा खजिना आहे.आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की आता ते दिवस इतिहास जमा झाले आहेत जेव्हा नोकरी मिळवण्यासाठी तुमच्याकडे डिग्री असणे अत्यंत महत्वाचे समजले जात होते. आता मात्र नोकरी मिळवण्यासाठी तुमच्याकडे त्या गोष्टीचे तुम्हाला किती ज्ञान आहे ? तुमच्याकडे योग्य कौशल्ये आहेत की नाही,तुम्ही समस्या सोडवू शकता की नाही ?या गोष्टींना महत्व दिले जाते.


        आज, आपण ज्या free online educational websites बघणार आहोत त्यांच्या साह्याने तुम्ही आपल्या आवडीच्या क्षेत्राबाबत ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त करू शकता.सर्टिफिकेट मिळवू शकता.एव्हढेच नाही तर योग्य तो कोर्स करून पैशेही कमवू शकता.आपल्याकडे असणाऱ्या वेळेचे योग्य नियोजन केले तर हे नक्कीच शक्य आहे.


         तसं पाहिलं तर आंतरजालावर या संबंधित अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत. त्यातील top 10 online education websites आपण बघणार आहोत.

1. eskillindia.org

भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाकडून भारताला कौशल्यपूर्ण भारत बनविण्यासाठी 'skill india' या योजनेची सुरुवात झाली. NSDC( national skill development corporation) या संस्थेने या उत्तम अशा वेबसाईटची निर्मिती केली आहे. इ स्किल इंडिया चे मोबाईलवर ऍप सुद्धा आहे.

या वेबसाईटवरील सर्व कोर्स आपण अगदी घरी बसून ऑनलाईन करू शकतो.agriculture, apparel, automotive, beauty, construction, electronics, gem and jewelry, healthcare, IT-ITES, अशा एकूण 9 क्षेत्रातील विविध कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध आहेत.  

मशरूम शेती, फॅब्रिक पेंटिंग, शिलाई मशीन, फोर व्हीलर रिपेयरिंग, ब्युटीशन, साबण तयार करणे, इलेक्ट्रिशियन, आर्टिफिशियल ज्वेलरी, प्रधानमंत्री आरोग्य मित्र, दंत सहाय्यक, कॉम्पुटर हार्डवेअर रिपेयरिंग, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वेब डिझायनिंग, c++ प्रोग्रॅमिंग, यांसारखे अनेक उत्तम कोर्स आपल्याला या वेबसाईटवर पाहायला मिळतात.

वेबसाईट - https://eskillindia.org/


2.edx.org

प्रत्येकात स्वतःच्या आयुष्यात, समाजामध्ये, आणि जगामध्येही बदल करण्याची क्षमता असते. ही क्षमता विकसित होण्यासाठी शिक्षण मोठा हातभार लावत असते. आणि म्हणूनच हे शिक्षण जगातील प्रत्येकाला अगदी सहज, घरी राहूनसुद्धा घेता आले पाहिजे, या उदात्त हेतूने जगप्रसिद्ध हॉवर्ड युनिव्हर्सिटी आणि एमआयटी यांनी संयुक्तपणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे.ही एक उच्च दर्जाची वेबसाईट आहे.

या वेबसाईटवर आर्किटेक्ट,इंग्लिश स्पिकिंग, डिजिटल मार्केटिंग, वेगवेगळ्या भाषा,  जर्नालिझम,  पायथॉन, डाटा प्रोसेसिंग, मशीन लर्निंग, न्यूट्रिशन आणि हेल्थ, डेव्हलपमेंटल सायकोलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, लिडरशिप ऍण्ड मॅनेजमेंट, इलेक्ट्रॉनिक संबंधित कोर्स,  शिक्षकांसाठी पेडॉगॉजी, क्लासरूम स्ट्रॅटेजी, एव्हढेच नाही तर, संगीत, इतिहास, औषधे, साहित्य संबंधित सुमारे 3000 कोर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत.

वेबसाईट - https://www.edx.org/


ऍप - https://play.google.com/store/apps/details?id=org.edx.mobile


3. Coursera.org

गुगल, स्टॅनफोर्ड, फेसबुक, इंपिरियल कॉलेज लंडन यांसारख्या सुमारे 200 युनिव्हर्सिटी आणि कंपन्या सोबत घेऊन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची निर्मिती झाली आहे. या ठिकाणी तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि डिग्री सुद्धा मिळवू शकता. वेबसाईटच्या म्हणण्यानुसार येथे शिकलेल्या एकूण विदयार्थ्यांपैकी  89% विद्यार्थ्यांना नोकरीविषयक फायदा झाला आहे. 5100 पेक्षा जास्त कोर्स या ठिकाणी आहेत. 25 पेक्षा जास्त डिग्री अभ्यासक्रम आहेत.


स्टॅनफोर्ड, मिशिगन सारख्या युनिव्हर्सिटीने विकसित केलेले मशीन लर्निंग, पायथॉन, करियर सक्सेस, डीप लर्निंग, बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी, excel स्किल फॉर बिझनेस यांसारखे उत्कृष्ट कोर्स याठिकाणी उपलब्ध आहेत.


वेबसाईट - https://www.coursera.org/in



4. Shawacademy.com

ऑनलाईन शिकण्यासाठी ही एक अतिशय उत्कृष्ट वेबसाईट आहे. कोर्सेसची जास्त गर्दी या ठिकाणी नाही, मात्र जे आहेत ते अतिशय उत्तम दर्जाचे आहेत.100 पेक्षा जास्त कोर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. 8 वर्षांपासून हा प्लॅटफॉर्म अस्तित्वात आहे. 12 मिलियन विद्यार्थी या प्लॅटफॉर्मशी जोडले गेले आहेत. ऍप अधिक सहज वापरता येते.


या प्लॅटफॉर्मवर फोटोग्राफी, म्युझिक, मार्केटिंग, टेक्नॉलॉजि, ब्युटी, लँग्वेज, हेल्थ वेलनेस, फायनान्स, डिजाईन, बिझनेस अँड ऍनालॅटिक्स या प्रकारात मोडणारे उत्कृष्ट असे मोफत कोर्स करता येणार आहेत.

वेबसाईट - https://www.shawacademy.com/

ऍप - https://play.google.com/store/apps/details?id=com.shawacademy.app


5. Swayam.gov

स्वयं हा भारत सरकारचा उपक्रम आहे. IGNOU, NCERT, UGC सारख्या प्रतिष्ठित संस्था या उपक्रमाशी जोडलेल्या आहेत. या ठिकाणी सुद्धा शेकडो कोर्स उपलब्ध आहेत. या ठिकाणी ठराविक वेळेतच तुम्हांला कोर्स जॉईन करून पूर्ण करायचा असतो. कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हांला credits मिळतात.
ग्राफिक्स ऍण्ड ऍनिमेशन डेव्हलपमेंट, ICT इन टिचिंग ऍण्ड लर्निंग, स्टुडंट सायकॉलॉजी, क्लाउड कॉम्पुटिंग, फाउंडेशन कोर्स इन कथ्थक, फिल्म स्टडी, ह्यूमन राईट्स, रोडमॅप ऑफ पेटंट क्रिएशन, मॅनेजमेंट ऑफ ह्यूमन रिसोर्सेस, इंडियन कल्चर ऍण्ड हेरिटेज, योगा प्रॅक्टिसेस, गाईडन्स ऍण्ड कौन्सिलिंग, यांसारखे अतिशय उपयुक्त free online courses with certificates याठिकाणी उपलब्ध आहेत.
वेबसाईट - https://swayam.gov.in/


ऍप -https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.swayam.app


6. Udemy.com

हजारो कोर्स तेही जवळपास 65 पेक्षा जास्त भाषेमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत. 40 मिलियन पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी ऑनलाईन शिकत आहेत. ही एक जगभरात प्रसिद्ध पावलेली वेबसाईट आहे. तुम्ही या ठिकाणी कोर्स केलेला असला तरी अनेक कंपन्यात सुद्धा तुम्हांला नोकरी मिळू शकते. या वेबसाईटचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही स्वतः एखादा कोर्स तयार करून या ठिकाणी अपलोड करू शकता.

 वेब डेव्हलपमेंट, एथिकल हॅकिंग, सायबर सेक्युरिटी, फोटोशॉप, ड्रॉविंग, जावा स्क्रिप्ट यासारखे उत्तम दर्जाच्या अनेक कोर्सचा आपण याठिकाणी अभ्यास करू शकतो.

वेबसाईट - https://www.udemy.com/


ऍप - https://play.google.com/store/apps/details?id=com.udemy.android


7. Google.com

आंतरजालावरील गुगल चे स्थान सर्वच जाणतात. मात्र online education website च्या स्पर्धेत गुगल स्वतः सुद्धा आहे. गुगल ने 'लर्न डिजिटल' नावाची वेबसाईट तयार केली असून अनेक महत्वाचे कोर्स ऑनलाईन अभ्यासासाठी उपलब्ध करून दिले आहेत.
 
डिजिटल मार्केटिंग, करियर डेव्हलपमेंट, डाटा अँड टेक या कॅटेगरी अंतर्गत 'फंडामेंटल्स ऑफ डिजिटल मार्केटिंग', गेट अ बिजनेस ऑनलाईन, बेसिक ऑफ कोड, यांसारखे महत्वाचे कोर्स या ठिकणी आपण पूर्ण करू शकतो.

वेबसाईट- https://learndigital.withgoogle.com/digitalunlocked/courses

8. Open culture

ही एक अशी वेबसाईट आहे की जी सर्वांनीच बुकमार्क करून ठेवायला हवी.या वेबसाईटवर आपण फक्त कोर्सेस नाही तर आणखीही बऱ्याच गोष्टी करू शकतो.

          उदाहरणच द्यायचं म्हटले तर, या वेबसाईटवर 1700 पेक्षा जास्त ऑनलाईन कोर्स आहेत. 1150 पेक्षा जास्त ऑनलाईन मुव्ही या ठिकाणी आहेत. सुमारे 1000 ऑडिओ बुक्स आपण येथे ऐकू शकतो. खूप सारी ई - बुक्स आपण वाचू शकतो.वेगवेगळी पॉडकास्ट या ठिकाणी उपलब्ध आहेत.

वेबसाईट - https://www.openculture.com/

9. Future Learn

जगभरातील अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांना बरोबर घेऊन या प्लॅटफॉर्मची निर्मिती झाली आहे. या ठिकाणी सुद्धा आपण अनेक कोर्सेसचा मोफत अभ्यास करू शकतो.

इन्ट्रोडक्शन टू फॉरेन्सिक सायन्स, एज्युकेशनल न्यूरोसायन्स यासारखे महत्वाचे कोर्स या वेबसाईटवर आहेत.

वेबसाईट - https://www.futurelearn.com/

10. Alison.com

195 पेक्षा जास्त देशातील विद्यार्थी या वेबसाईटवरून शिक्षण घेत आहेत. 3000 पेक्षा जास्त कोर्स या ठिकाणी आहेत. आणि महत्वाचे म्हणजे यातील बहुतेक कोर्स केल्यानंतर तुम्हांला सर्टिफिकेट मिळते तेही मोफत.

   पर्सनल डेव्हलपमेंट, हेल्थ, टिचिंग अँड अकॅडमीक्स  इत्यादी विविध क्षेत्रांतर्गत अनेक महत्त्वाचे कोर्स या ठिकाणी आहेत.


वेबसाईट - https://alison.com/


ऍप - https://play.google.com/store/apps/details?id=com.alison.mobile.flutter

अशाप्रकारे वरील 10 वेबसाईटचा वापर करून आपण आपल्या ज्ञानात नक्कीच भर घालू शकतो, नवीन कौशल्ये आत्मसात करू शकतो एव्हढेच नाही तर अर्थार्जनही करू शकतो. 

वरील वेबसाईटवर रजिस्ट्रेशन कसे करायचे, कोर्स जॉईन कसा करायचा हे पाहण्यासाठी  खालील व्हिडिओ बघा.


      



अशाच प्रकारचे महत्वाचे शैक्षणिक अपडेट्स थेट मोबाईलवर (whatsapp)मिळवा..👇

https://chat.whatsapp.com/BDffROfyenP2sZQI93Cijp

अशाच प्रकारचे महत्वाचे शैक्षणिक अपडेट्स थेट फेसबुकवर मिळवा..👇

https://www.facebook.com/groups/379344020177108/?ref=share

या अगोदर प्रसिद्ध झालेले व पुढील शैक्षणिक अपडेट्स थेट टेलिग्रामवर मिळवा👇

https://t.me/schoolcompanion07









Post a Comment

0 Comments