Ticker

6/recent/ticker-posts

मी ज्ञानवंत, गुणवंत, यशवंत..! | मार्च 2025 प्रश्नावली | सामन्यज्ञान प्रश्न आणि उत्तरे |

     मी ज्ञानवंत, गुणवंत, यशवंत..!


विद्यार्थी, शिक्षक व पालक ....  सर्वांना नमस्कार.

www.schoolcompanion.in हे एक शैक्षणिक वेब पोर्टल आहे. यापूर्वी कोरोना काळात आम्ही ‘आमचा अभ्यास’ या स्मार्ट PDF ची निर्मिती केली. राज्यभरातील विद्यार्थी व शिक्षकांना त्या काळात शिक्षण चालू ठेवण्यासाठी  ‘स्मार्ट PDF’ ची मदत झाली होती.

आता, चालू शैक्षणिक वर्षापासून (2024-25) आम्ही विद्यार्थ्यांसाठी  मी ज्ञानवंत, गुणवंत, यशवंत..!  हा उपक्रम घेऊन येत आहोत.

शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांनी ‘सामान्यज्ञान’ या विषयाचा अभ्यास करायला हवा असे मत ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ मध्ये व्यक्त करण्यात आले आहे. राष्ट्राचे भवितव्य विद्यार्थ्यांच्या हातात असणार आहे. समाज परिवर्तनासाठी विद्यार्थ्यांची महत्वाची भूमिका असणार आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होणे आवश्यक आहे.  आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच सामान्यज्ञान  या विषयाची  गोडी निर्माण व्हावी, त्यांचा व्यक्तिमत्व  विकास व्हावा, यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे.

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती देण्याचा प्रयत्न असणार आहे, ज्यामुळे शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेचे योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. प्रश्न जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ, अचूक, व सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न असणार आहे.

आपल्या सूचना व अभिप्राय उपक्रम यशस्वी करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत.


उपक्रमाची कार्यवाही :

1.इयत्ता पहिली ते आठवीचे विद्यार्थी या उपक्रमात भाग घेऊ शकतील. इयत्ता 1 ली व 2 री साठी तोंडी तर पुढील वर्गासाठी लेखी सराव घेणे अपेक्षित आहे.

2.दररोज आदल्या दिवशी किंवा सकाळी  व्हॉटसअॅप ग्रुपवर  प्रश्नावली पाठवली जाईल .  

3. शाळेतील शिक्षकांनी / विद्यार्थ्यांनी  ही प्रश्नावली फळ्यावर लिहावी. (प्रश्नावली लिहिलेला हा फळा व्हरांड्यात दिवसभर असेल.) दररोज नियोजनाप्रमाणे त्या दिवसाच्या परिपाठ गटातील एक विद्यार्थी परीपाठाच्या वेळेत सर्व विद्यार्थ्यांसमोर ही प्रश्नावली सादर करतील. दिवसभरात मधल्या सुट्टीत वेळ मिळेल तेव्हा विद्यार्थी ही प्रश्नावली उपक्रमासाठी केलेल्या वहीत लिहून घेतील. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न व उत्तरे पाठ करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. ( शिक्षकांनी दररोजची प्रश्नावली विद्यार्थ्यांच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर देखील पाठवावी. जेणेकरून पालकही विद्यार्थ्यांचा सराव करून घेऊ शकतील.)

4. महिन्यातून एकदा सराव परीक्षेचे नियोजन करण्यात येईल.

5. शैक्षणिक वर्षाच्या शेवटी अंतिम परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.

6.‘ज्ञानवंत, गुणवंत, यशवंत’ विद्यार्थ्यांना प्रायोजकांच्या सहकार्याने प्रमाणपत्र व बक्षीस दिले जाईल.

7. चला, आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना  सामान्यज्ञान  विषयात गोडी निर्माण करूया,  स्पर्धा परीक्षेसाठी त्यांना तयार करूया, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करूया..

या अभियानात सहभागी होण्यासाठी व अधिकच्या मार्गदर्शनासाठी खालील ग्रुपमधे सहभागी होऊया...




प्रश्नावली - मार्च 2025 

दिनांक प्रश्नावली
01/3/2024प्रश्नावली 
02/3/2024प्रश्नावली
03/3/2024प्रश्नावली
04/3/2024प्रश्नावली
05/3/2024प्रश्नावली
06/3/2024प्रश्नावली
07/3/2024प्रश्नावली 
08/3/2024प्रश्नावली
09/3/2024प्रश्नावली
10/3/2024प्रश्नावली
11/3/2024प्रश्नावली
12/3/2024प्रश्नावली
13/3/2024प्रश्नावली
14/3/2024प्रश्नावली
15/3/2024प्रश्नावली
16/3/2024प्रश्नावली
17/3/2024प्रश्नावली
18/3/2024प्रश्नावली
19/3/2024प्रश्नावली
20/3/2024प्रश्नावली
21/3/2024प्रश्नावली
22/3/2024प्रश्नावली
23/3/2024प्रश्नावली
24/3/2024प्रश्नावली
25/3/2024प्रश्नावली
26/3/2024प्रश्नावली
27/3/2024प्रश्नावली
28/3/2024प्रश्नावली
29/3/2024प्रश्नावली
30/3/2024प्रश्नावली
31/3/2024प्रश्नावली

Post a Comment

0 Comments