
विद्यार्थी, शिक्षक व पालक .... सर्वांना नमस्कार.
www.schoolcompanion.in हे एक शैक्षणिक वेब पोर्टल आहे. यापूर्वी कोरोना काळात आम्ही ‘आमचा अभ्यास’ या स्मार्ट PDF ची निर्मिती केली. राज्यभरातील विद्यार्थी व शिक्षकांना त्या काळात शिक्षण चालू ठेवण्यासाठी ‘स्मार्ट PDF’ ची मदत झाली होती.
शैक्षणिक वर्षा (2024-25) पासून आम्ही विद्यार्थ्यांसाठी मी ज्ञानवंत, गुणवंत, यशवंत..! हा उपक्रम घेऊन येत आहोत.
शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांनी ‘सामान्यज्ञान’ या विषयाचा अभ्यास करायला हवा असे मत ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ मध्ये व्यक्त करण्यात आले आहे. राष्ट्राचे भवितव्य विद्यार्थ्यांच्या हातात असणार आहे. समाज परिवर्तनासाठी विद्यार्थ्यांची महत्वाची भूमिका असणार आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच सामान्यज्ञान या विषयाची गोडी निर्माण व्हावी, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे.
शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती देण्याचा प्रयत्न असणार आहे, ज्यामुळे शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेचे योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. प्रश्न जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ, अचूक, व सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न असणार आहे.
सोमवार ते शुक्रवार दररोज 5 प्रश्न असेलेली pdf ग्रुपवर सादर केली जाते. विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवशी प्रश्न पाठ करणे अपेक्षित आहे.शालेय आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी विद्यार्थ्यांच्या सरावासाठी चाचणी सादर केली जाईल.
मी ज्ञानवंत, गुणवंत, यशवंत..! चाचणी क्र. 09
6 Comments
This comment has been removed by the author.
ReplyDeleteSameer
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteResult not
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete