मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान| मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान बक्षीस मिळवण्यासाठी काय करायला हवे ?|
January 14, 2024
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान| मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान बक्षीस मिळवण्यासाठी काय करायला हवे ?|
शिक्षक मित्रांनो......
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान राबविण्याचे प्रस्तावित आहे.
राज्यात सन २०२०-२१ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना ही पूर्णतः राज्य पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे सदर योजनेसाठी निश्चित करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत ४७८ शाळांचा समावेश असलेला सदर योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वित आहे. सदर योजना शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी राबविण्यात येते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत आतापर्यंत केवळ भौतिक सुविधांचे निर्माण या घटकांतर्गत लहान बांधकामे व मोठी बांधकामे याच बाबींकडे लक्ष देण्यात आले असून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अभियानाचा अधिक प्रभावी विस्तार होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन/अध्यापन/प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास इत्यादी अशा अनेकविध घटकांचा अंतर्भाव होणे आवश्यक झाले आहे. अशा महत्त्वपूर्ण घटकांना योग्य त्या प्रमाणात प्राधान्य दिल्यास शाळेचा सर्वागीण विकास निश्चितपणे होऊ शकतो.
उपरोल्लेखित घटकांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या व्हावी यासाठी शाळांनी आपापसात स्पर्धा करणे हा त्यासाठीचा सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे स्पर्धात्मक अभियान राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
शासन निर्णय काय आहे ?
शासन निर्णयः-
१. अभियानाची व्याप्ती-:
i) राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे.
ii) या अभियानासाठी शाळांची विभागणी अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व ब) उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. याचा अर्थ प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांशी स्पर्धा करणार नाहीत. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल.
सदर अभियान अ) बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र ब) वर्ग अव वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच क) उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर खालीलप्रमाणे राबविण्यात येईल.
२. अभियानाची उद्दिष्टे :-
i) विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे.
ii) शिक्षणासाठी पर्यावरण पूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे.
iii) क्रीडा, आरोग्य, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणे; राज्यातून कच-याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे.
iv) राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्याथ्यांना प्रोत्साहित करणे.
v) विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्व पटवून देणे,
vi) विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण,
vii) शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे,
३. अभियानाचा कालावधी:-
सदर अभियानाची सुरुवात औपचारिक कार्यक्रमाद्वारे होईल. त्यानंतर आयुक्त (शिक्षण) हे ज्या दिनांकास निश्चित करतील त्या दिनांकापासून पुढील ४५ दिवसांच्या कालावधीकरिता हे अभियान चालू राहील. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन या ४५ दिवसात करणे आवश्यक राहील.
या उपक्रमासाठी 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा कालावधी असणार आहे .
४. अभियानाचे स्वरूपः-
४.१ अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल.
अ) विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग एकूण ६० गुण
ब) शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग- एकुण गुण ४० गुण
या अभियानात सहभागी होण्यासाठी व अधिकच्या मार्गदर्शनासाठी खालील ग्रुपमधे सहभागी होऊया...
1. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान GR: DOWNLOAD करा
2. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान कलदर्शिका : DOWNLOAD करा.
उपक्रमात सहभागी होण्यासाठी school पोर्टल वर नोंदणी कशी करायची याबाबत संपूर्ण मार्गदर्शन :
0 Comments