मी आणि माझे कुटुंब Me and My Family | इयत्ता पहिली भाग 1| बालभारती एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक |
July 23, 2023
मी आणि माझे कुटुंब Me and My Family | इयत्ता पहिली भाग 1| बालभारती एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक :
नमस्कार, शिक्षक व विदयार्थी मित्रांनो...
इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकात आमूलाग्र बदल करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२०चा विचार करून शिक्षणातील एकात्मिक दृष्टिकोनावर आधारित एकात्मिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती व अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. Learn how to learn व Lifelong Learner यांवर या शैक्षणिक धोरणात भर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर एकात्मिक शिक्षणावरही भर देण्यात आलेला आहे.
'इयत्ता पहिली' च्या या पाठ्यपुस्तकाची निर्मिती एकात्मिक स्वरूपात करण्यात आली असून भाषा, गणित, इंग्रजी आणि खेळू, करू, शिकू या विषयांचा एकत्रित विचार करण्यात आलेला आहे. आर्ट इंटिग्रेटेड (Art Integrated) आणि स्पोर्ट इंटिग्रेटेड (Sport Integrated) दृष्टिकोनाचा विचारही पाठ्यपुस्तक करताना केलेला आहे आणि त्यासाठीच खेळू, करू, शिकू हा विषयही यात सामावून घेतला आहे. बालकांमध्ये वय वर्ष आठपर्यंत एकाचवेळी अनेक भाषा शिकण्याची क्षमता असते, याचा विचार करून पाठ्यपुस्तकात गरजेनुसार द्विभाषिक दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे.
या पाठ्यपुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच पाठ्यपुस्तकात अनेक प्रतीकांचा (emoji) उपयोग करण्यात आलेला • आहे. त्यामुळे प्रतीके पाहूनच विदयार्थ्यांना कोणती कृती करावयाची आहे याचा बोध होऊ शकतो. याबाबतची माहिती पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीच्या भागातच देण्यात आलेली आहे. विचारक चाव्या (Thinker Keys) आणि सहा थिंकिंग हॅट्स (Six thinking hats) यांचा वापर करण्यात आलेला आहे.
याबाबतच्या अधिक माहितीसाठी,नोकरी व रोजगाराच्या संधी, दररोजचे वृत्तपत्र, शैक्षणीक घडामोडी, शिष्यवृत्ती सराव, स्पर्धा परीक्षा इत्यादींबाबत जाणून घेण्यासाठी व्हॉट्सॲप समूहात सामील व्हा..
0 Comments