Ticker

6/recent/ticker-posts

निपुण भारत प्रतिज्ञा मराठी | Nipun Bharat Pratidnya In Marathi | Nipun Pratidnya PDF |

 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२०' नुसार, प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही, असे ठळकपणे नमूद आहे. वय वर्षे ३ ते ९ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना 'मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान' प्राप्त करण्यासाठी त्वरीत एक राष्ट्रीय अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सदर अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक व समाज या सर्वांनी सर्वंकष पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. यासाठीच भारत सरकारने "समग्र शिक्षा" अंतर्गत 'निपुण भारत मिशन' योजना आखली. 

या योजनेअंतर्गत  महाराष्ट्र शासनाने 'निपुण प्रतिज्ञा' जाहीर केली आहे. ही 'निपुण प्रतिज्ञा मराठी' खालीलप्रमाणे आहे.

निपुण प्रतिज्ञा (मराठीमध्ये)

आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्ये आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत.

पण सारे मिळून, आपल्या मुलांसाठी निखळ आनंददायी समृद्ध अनुभवाच्या संधी देणारी, अभिव्यक्तीचं आकाश खुलं करणारी, मुक्त छंद जोपासणारी, नेतृत्वाच्या संधी देणारी आणि आत्मसन्मान जपणारी शाळा निर्माण करूया.. आपण सारे मिळून अशी शाळा आणि घर बनवूया.. जिथे बालके अर्थपूर्ण वाचन, हेतुपूरक लेखन व गणिती व्यवहार प्रत्यक्ष जीवनात उतरवतील आणि आयुष्यभर विदयार्थी राहतील...

अशाप्रकारे, महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास आरोग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन 'निपुण बालक' घडविण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत.


निपुण प्रतिज्ञा (मराठी) pdf वाचा किंवा डाऊनलोड करा.




Post a Comment

0 Comments