Ticker

6/recent/ticker-posts

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी स्वरूप व पेपर पॅटर्न | मिडलस्कूल स्कॉलरशिप |

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी स्वरूप व पेपर पॅटर्न


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा :

मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी बाबत ! तर, इयत्ता पाचवीची 'पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा' अतीशय महत्त्वपूर्ण अशी परीक्षा असते. मुलांच्या शालेय जीवनातील पहिली स्पर्धात्मक परीक्षा! 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा स्वरूप व पेपर पॅटर्न :

'पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा' स्वरूप कसे असते ? एकूण किती पेपर्स असतात ? कोणते पेपर्स असतात ? कोणते विषय असतात ? कोणत्या विषयाला किती गुण असतात ? विषयामध्ये कोणत्या घटक वा उपघटकांचा समावेश असतो ? घटक व उपघटकांवर आधारित कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ? त्या घटकाला किती भारांश असतो ? 'शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी' बाबत या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत.

शिष्यवृत्ती परीक्षा सर्व माहिती व अभ्यास मार्गदर्शन : व्हॉट्स ॲप ग्रुप

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण दोन पेपर्स असतात.

पेपर १ : मराठी भाषा (५०गुण) व गणित (१००गुण) : वेळ ९० मि.

पेपर २:इंग्रजी भाषा (५०गुण) व बुध्दीमत्ता  (१००गुण) :वेळ ९० मि

पेपर 1 : विषय, प्रश्नसंख्या व गुण.   

विषय प्रश्न संख्या गुण
मराठी 25 50
गणित 50 100
एकूण 75 150


पेपर 2 : विषय, प्रश्नसंख्या व गुण

विषय प्रश्न संख्या गुण
इंग्रजी 25 50
बुद्धिमत्ता चाचणी 50 100
एकूण 75 150 


चला, तर मग मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया पेपर 1 विषयी.. सर्वप्रथम मराठी व नंतर गणित या विषयात कोणकोणते घटक व उपघटक असतात, प्रत्येक घटकाला भारांश किती असतो हे समजून घेऊया..

विषय - मराठी (एकूण प्रश्न 25, गुण 50)

घटक/उपघटक भारांश
1. वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे :
1.उतारा व त्यावर आधारित प्रश्न
2. वृत्तपत्रांतील जाहिरातींवर व बातम्यांवर आधारित प्रश्न
3.कविता व कवितेवर आधारित प्रश्न
24%
2. कार्यात्मक व्याकरण:
4.शब्दांच्या जाती :
अ) नाम
आ)सर्वनाम
इ) विशेषण
ई) क्रियापद
5. लिंग
6. वचन
7. काळ
8. विरामचिन्हे
9. वाक्याचे भाग
10. शुद्ध व अशुद्ध शब्द
20%
3.भाषेचा व्यवहारात उपयोग:
11. वाक्प्रचार
12. म्हणी
13. संवाद व त्यावर आधारित प्रश्न
14. निर्देश, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद इत्यादी:
अ) निर्देश - योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे.
आ) सुसंगत वाक्यांचा परिच्छेद
इ) वक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे
ई) सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे.
15. माहिती तंत्रज्ञानविषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे.

24%
4. शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व
16. समानार्थी शब्द
17. विरुद्धार्थी शब्द
18. शब्दकोडी
19. जोडशब्द
20. आलंकारिक शब्द
21. शब्दसमुहाबद्दल एक शब्द
22. समूहदर्शक शब्द
23. पिलूदर्शक शब्द
24. घरदर्शक शब्द
25. अक्षरे जुळवून शब्द तयार करणे
26. वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे
27. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे
28. भाषाविषयक सामान्यज्ञान
 32%

Post a Comment

0 Comments