Ticker

6/recent/ticker-posts

रानवेडी कविता | इयत्ता तिसरी विषय मराठी कविता | Ranvedi kavita mp3 |

                     By: school companion team

शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :


रानवेडी

पोर डोंगराव भाळली

त्याच्या नादी लागुनिया,

आख्ख्या रानात पांगली, 

पोर डोंगराव भाळली ॥धृ.॥


रानगवताची फुलं

 तिच्या कानामंदी डुलं

 अन् चाईचा मोहर

 गळ्यामंदी गळसर

 अहो टंटणी फुलली

 तिच्या नाकामंदी फुली 

अन् बुरांडीची फुलं तिनं 

केसात माळली पोर डोंगराव भाळली ॥ १ ॥


पोर माळावर खेळली

अन् वाऱ्यासंगं बोलली

वड-पारंबीचा झुला

तिचा गेला आभाळाला

पानसाबरीचं बोंड खाल्लं

लाल झालं तोंड 

अहो हसता हसता

मऊ गवतात लोळली

पोर डोंगराव भाळली ॥ २ ॥


गाई दांडाच्या वाटानं

चाली यंगत नेटानं 

ढोल ढगांचा वाजला 

नाच मोराचा पाहिला 

आली पाऊस पहाळी 

तवा गडदीक पळाली 

पावसानं भिजवली

तरी उन्हात वाळली 

पोर डोंगराव भाळली  ॥ ३ ॥

- तुकाराम धांडे 

गायिका- प्रणाली पाटील.

Post a Comment

0 Comments