Ticker

6/recent/ticker-posts

माय मराठी | इयत्ता पाचवी विषय मराठी | may marathi mp3 poem for download |

                  By: school companion team

शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :


 

            माय मराठी !

माय मराठी! तुझिया पायी तनमनधन मी वाहियले, तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहिले.

कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मज आई, मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्भर अंगाई.

तुझे झरे अन् तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा, हवाहवासा मला वाटतो राग तुझा, संतोष तुझा.

माय मराठी! तुझिया अंकी लोळण घेते, बागडते, तसेच अलगत तब आभाळी भरारणे मज आवडते.

तुझे चालणे, तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी, जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी.

तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची, अर्थ साजरा, गंध लाजरा, नवलपरी पण रंगांची.

माय मराठी! तुझियासाठी बात होउनी जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.

• संजीवनी मराठे -

गायिका - प्रणाली पाटील

Post a Comment

0 Comments