Ticker

6/recent/ticker-posts

मोठा निर्णय ! इयत्ता 1ली ते 8वी चे सर्व विद्यार्थी पास. परीक्षा न घेण्याचा सरकारचा निर्णय !

 

 राज्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहेत.अशा परिस्थितीत राज्य सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात येणार आहे. त्यामुळे, पहिली ते आठवीपर्यंतचे सर्वच विद्यार्थी परीक्षेशिवायच पास होऊन पुढील वर्गात गेले आहेत.


आज, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर केला, ट्विटर वर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला. त्या म्हणाल्या की- 
आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या प्रकारे राज्यात करोनाची रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आज मी आपल्याशी संवाद साधत असताना, इयत्ता पहिली ते आठवी याचे वार्षिक मुल्यमापन संदर्भात मी बोलणार आहे. मला सांगायला पाहिजे की मधल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन यूट्यूब, गुगल आदींच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं.


खरंतर पहिली ते चौथीपर्यंत शाळा या वर्षात आपण शाळा सुरू करू शकलो नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा आपण सुरू केल्या, परंतु काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, काही ठिकाणी सुरू होऊ शकल्या नाहीत. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी देखील त्यांचा अभ्यासक्रम त्या पूर्ण करू शकल्या नाहीत. परंतु आपण सातत्यपूर्ण हा प्रयत्न करत होतो, की मुलांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहचावं आणि मुलाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये.


तसेच, आता करोनाची परिस्थिती पाहता आणि वार्षिक मुल्यमापनाबाबत निर्णय घेत असताना, आम्ही शालेय शिक्षण माध्यमाद्वारे असा निर्णय घेत आहोत की, पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत, आरटीईच्या अंतर्गत म्हणजे मोफत शिक्षण अधिकाराच्या कायद्यांतर्गत, खरंतर या मुलांचं वर्षभराचं मुल्यमापन बघितलं पाहिजे, परंतु यंदाची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यामुळे यंदा हे होणं शक्य नाही.


 म्हणून आज आम्ही शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून असा निर्णय घेत आहोत की, राज्यातील जे पहिली ते आठवी इयत्तेमधील विद्यार्थी आहेत, शिक्षण हक्क अधिकाऱाच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात, त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करून त्यांना पुढील इयत्तेत पाठवण्यात येत आहे. असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.


नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होतील. असं असलं तरी दहावीच्या परीक्षा मात्र नियमित वेळापत्रकाप्रमाणेच होतील. असेही त्यांनी सांगितले.

अशाच प्रकारचे महत्वाचे शैक्षणिक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवा..👇

https://chat.whatsapp.com/BDffROfyenP2sZQI93Cijp

अशाच प्रकारचे महत्वाचे शैक्षणिक अपडेट्स थेट फेसबुकवर मिळवा..👇

https://www.facebook.com/groups/379344020177108/?ref=share








Post a Comment

0 Comments