एक लहानसा विषाणू.....धडा देऊन गेला!
आजघडीला अखिल मानवजात कोरोनाविरुद्ध लढाई लढत आहेत. याप्रसंगी सरकार, पोलीस, डॉक्टर्स, नर्स, स्वछता कामगार...मोठ्या धीराने लोकांना सेवा देत आहेत.सर्वसामान्यांना घराच्या बाहेर पडायलाही भीती वाटत असताना ही मंडळी या भयंकर विषाणूबरोबर दोन हात करत आहेत.नतमस्तक..!एव्हढंच म्हणू शकतो..पण म्हणून सर्व ठीक आहे, असे मुळीच नाही. 2 महिन्यापासून शेजारच्या चीनमध्ये हा विषाणू धुमाकूळ घालत असतांना, आपण धोका ओळखण्यात, आणि तत्काळ उपाययोजना करण्यात कमी पडलो याची खंत आहे.जेव्हा विषाणू आपल्या दारात आला, तेव्हा ज्या उपाययोजना आपण करतोय, ज्याप्रमाणे आपली लोकं कारण नसताना रस्त्यावर गर्दी करुन सरकारला मदत करत आहेत ते पाहून आपसूक आपला हात आपल्या कपाळकडे जातो.आता, याबाबत सोशल मीडियावर महापूर आलेला आहे. तेव्हा जास्त बोलत नाही.. पण काय सांगतोय हा विषाणू आपल्याला?? या महासंकटातूनही आपण काही शिकणार आहोत की नाही??
शिक्षक-शारीरिक शिक्षण व आरोग्य हा विषय वर्षाच्या शेवटी फक्त मार्क्स देण्यासाठी नसून उद्याचा सुजाण नागरिक घडविण्यासाठी एक महत्वाचा घटक असल्याचा शिक्षकांना साक्षात्कार झाला.ते मुलांना आरोग्याच्या चांगल्या सवयी अगदी लहानपणापासूनच लावायला लागले. सार्वजनिक जीवनात जे चुकीचे वागतील,( उदा. रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे) इ. त्यांना जाब विचारण्याची हिम्मत मुलांमध्ये निर्माण करू लागले. कारण शिक्षकांना हेही समजले की सार्वजनिक जीवनात फक्त 'मी' चांगले वागणे पुरेसे नसते. माणसाच्या आयुष्यात 'शिक्षण आणि आरोग्य' या दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत-ही गोष्ट मुलांच्या मनावर बिंबवू लागले.निसर्गाला सोबत घेऊनच विकास साधता येणार आहे;निसर्गाला हानी पोहचून नाही-आणि हा धडा आयुष्यभर लक्षात ठेवा- शिक्षक मुलांना सांगू लागले.
डॉक्टर- दवाखान्यात दररोजची प्रॅक्टिस करत असतांनाच जगातील वैद्यकीय घडामोडीवर लक्ष ठेवू लागले.सरकार यांच्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षणांचे आयोजन करू लागले.नवीन उद्भवणारे आजार, साथी याबाबत अद्ययावत राहण्यासाठी सर्व डॉक्टर त्यात सहभागी होऊ लागले.आता,यांच्या संघटना सरकारला आरोग्याच्या बाबतीत वेळोवेळी सल्ला देऊ लागल्या.प्रसंगी सरकारला धारेवर धरू लागल्या. एखादी संसर्गजन्य साथ फैलावण्याच्या अगोदरच त्याविरुद्ध लढण्याविरुद्ध आवश्यक ते किमान मूलभूत साहित्य ते उपलब्ध करून ठेवू लागले. ' दवाखाने चालू ठेवा' असे सरकारने आपल्याला सांगण्याची वेळ येणार नाही, याची ते काळजी घेऊ लागले.
पत्रकार-पत्रकारांना आपण लोकशाहीतील एक महत्वाचे घटक आहोत याची जाणीव झाली. लॉकडाउनच्या काळात पत्रकारांनी लोकमान्य यांनी 'सुधारक' तर आंबेडकरांनी 'मूकनायक' कसे चालवले, याचा अभ्यास केला. समाजातील कोणत्याही कठीण प्रसंगी आपली भूमिका महत्त्वाची असते हे त्यांच्या लक्षात आले.येथून पुढे, फक्त 'माहिती-मनोरंजन' पत्रकारिता न करता विशिष्ट भूमिका घ्यायची त्यांनी ठरवले.गावातील नेत्याने जरी 'जाहिराती' दिल्या असल्या तरी चुकीचं वागल्यावर ते त्याच्याविरोधातही लिहू लागले. पत्रकार, आता वस्तुनिष्ठ पत्रकारिता करू लागले. शोध-पत्रकारितेचा नव्याने जन्म झाला. ग्रामीण पत्रकार
ग्रामपंचायतीला, आरोग्य केंद्राला, रेशन दुकानाला,शाळेला भेट देऊ लागले. एखाद्या आपत्तीच्या प्रसंगी मोठ्या धैर्याने लोकांना उपयुक्त अशी पत्रकारिता करू लागले.
ग्रामस्थ- लग्न, हळदीला लोकं आवर्जून उपस्थित असतात तशीच ग्रामसभेलाही गावातील बहुतेक लोकं उपस्थित राहू लागली.सरपंच, ग्रामसेवक यांच्यासोबत गावातील स्वच्छता आरोग्य, रेशन दुकान, शाळा, याबाबत चर्चा करू लागली.सांडपाणी, स्वच्छता, सवयी याबाबतीत चुकीचं वागणाऱ्या कुटुंबाला ग्रामसभतेच समज देण्यात येऊ लागली. ग्रामपंचायतीला आलेला निधी व खर्च यांचा तपशील जाणून घेऊ लागली.निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या उमेदवाराला शिक्षण आणि आरोग्यासाठी तू काय करणार? असा प्रश्न विचारू लागले.प्रत्येक गावात villege care fund स्थापन करण्यात आला.गावागावांत वाचनालय, व्यायामशाळा निर्माण केल्या. सर्व गावातील लोकांनी एकत्र येऊन हरिनाम सप्ताह,मंदिर, मशीद, यात्रा, यावरील खर्च कमी करून गावात सुसज्ज आरोग्य केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला.गावागावांत तंबाखू व गुटखाबंदी करण्यात आली.गावात विद्युतदाहिणीची व्यवस्था करण्यात आली. दशक्रिया,तेराव्यासारख्या विधी न करण्याचा निर्णय घेण्यात आला.अशाप्रसंगी वाचलेली रक्कम villege care fund मध्ये जमा करण्यात येऊ लागली. दिवाळी, ईद,ख्रिसमस सारखे सण साधेपणाने साजरे होऊ लागले. ग्रामस्थ आपले हक्क मिळवतानाच जबाबदाऱ्याही पार पाडू लागले.
युवा वर्ग- गावागावातील तरुण एरव्हीचे मतभेद विसरून एकत्र जमून गावाच्या भल्यासाठी लघु, दीर्घकालीन कृतीआराखडे तयार करू लागले. त्यांनी शाळेत, अंगणवाडीत, आरोग्यकेंद्रात,ग्रामपंचायतीत आळीपाळीने स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी तुकड्या तयार केल्या. आपले लग्न साध्या पद्धतीने करून वाचवलेल्या पैशाचा उपयोग कृतीआराखड्यात ठरवलेले उपक्रम पार पाडण्यासाठी करायचा असा निश्चय केला.गावातील कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, धान्यपूरवठा, अशा विभागवार सदस्य त्यांच्यातूनच निवडण्यात आले.महिन्याच्या शेवटी या सर्वांची सभा होऊ लागली.या सभेत, ही सर्व मंडळी दूरदृष्टी ठेवून,सध्याच्या समस्यांची उकल करत, भविष्यातील समस्यांचा अंदाज घेऊन कार्यवाही करू लागले.
पोलीस-कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच पोलीस आता आपल्या क्षेत्रात स्वछता व आरोग्याच्या बाबतीतही आग्रही राहू लागले.एखादा संसर्गजन्य आजार फैलावण्याची वाट न पाहता पोलीस आता सुरवातीपासूनच स्वछता आणि आरोग्याच्या बाबतीत चुकीचं वागणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना वठणीवर आणू लागले.सोशल डिस्टनसिंग राहण्यासाठी, कधीच गर्दी होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रांतील दुकानदार व्यापारी यांना मार्गदर्शक तत्वे ठरवून दिले.सर्व पोलीस 'डोळे उघडे' ठेवून आपल्या कार्यक्षेत्रात फिरू लागले. पत्रकारांना विश्वासात घेऊन त्यांच्या मदतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवू लागले.
लोकप्रतिनिधी- आपल्या जाहीरनाम्यात शिक्षण, आरोग्य, स्वछता याबाबतीत मी काय केले, काय करू इच्छितो हे विशेषत्वाने सांगू लागले. विकासनिधींची मोठी रक्कम ते याच घटकांवर खर्च करू लागले.गावागावांत अत्याधुनिक शाळा, आरोग्यकेंद्र, वाचनालय, व्यायामशाळा निर्माण करण्याकडे ते लक्ष देऊ लागले.पुतळ्यांचं, धर्माचं, जातीचं राजकारण करण्याचे दिवस गेले हे त्यांच्या लक्षात आले.एखादया आपत्तीला तोंड देण्यासाठी, त्यावेळी आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांना मदत करण्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवकांची फौज लोकप्रतिनिधिंनी तयार करून ठेवली.
सरकार-सरकारने विविध जाती, धर्म, पंथाचे राजकारण थांबवले.त्यांना समजून चुकले, जेव्हा आपत्ती येते तेव्हा ती ना जात पाहते, ना धर्म पाहते.नवीन पुतळे, स्मारके, मंदिरं, चर्च, मशीदसाठी निधी दिला जाणार नाही, असे त्यांनी जाहीर करून टाकले.शिक्षण, आरोग्यासाठीचा अर्थसंकल्पातला टक्का वाढवला.प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक दवाखाने उभारण्याचे सरकारने ठरवले.सरकारी शाळांवर विशेष लक्ष देऊ लागले. विदयार्थ्यांच्या मनात आरोग्य, स्वच्छता, निसर्ग याबाबतीत जागरूकता निर्माण करण्यासाठी ठोस कार्यक्रमाची आखणी करण्यात आली व त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे ठरवले. कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येऊ लागले.
मानवजात- अवघ्या मानवजातिला पुन्हा एकदा धडा मिळाला-आपण म्हणजे हे विश्व नाही;या विश्वातला आपण एक लहानसा ठिपका आहोत.आपण आहोत म्हणून निसर्ग नाही;निसर्ग आहे म्हणून आपण आहोत.मानवाला हेही समजले की जास्त हव्यासाची परिणीती फक्त आणि फक्त विध्वंस! जगण्यासाठीच्या आपल्या गरजा कमीत कमी ठेवायला हव्या.ह्या गरजा भागवताना निसर्गाला कमीत कमी हानी कशी पोहचेल याचा विचार होऊ लागला.खानपानाच्या सवयी निसर्गाला अनुकूल अशाच हव्यात, ही विचारधारा सर्वांनी मान्य केली.संकुचित ठरणाऱ्या राष्ट्रवादापेक्षा 'हे विश्वची माझे घर' ही भावनाच अधिक विश्वासार्ह आहे. ही भावना अवघ्या विश्वात मूळ धरू लागली.

0 Comments