Ticker

6/recent/ticker-posts

मूल नेमकं शिकतं कसं | मुलाचा कल काय आहे ? कसे ओळखणार |



राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन आणि लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यास, चिखलगाव, दापोली, जिल्हा ।रत्नागिरी (लोकमान्य टिळक यांचे जन्मगाव)आयोजित 'समृद्ध भाषा समृद्ध मूल' या तीन दिवसीय कार्यशाळेत उपस्थित राहण्याची संधी मिळाली.

Brain based learning या विषयावर पीएचडी केलेल्या डॉ. श्रुती पानसे यांचे व्याख्यानाचे आयोजन या कार्यशाळेत केले होते.त्यांच्या व्याख्यानातील मूल नेमकं शिकतं कसं ? याबाबतचे काही महत्वाचे मुद्दे मी खाली मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

              

मूल नेमकं शिकतं कसं ?

मूल शिकतं कसं? या महत्वाच्या प्रश्नावर जगभरात खूप मोठे संशोधन झाले आहे, चालू आहे. या प्रश्नाचं उत्तर मिळवतांना काही नवीन प्रश्न उपस्थित झाले, त्यात, मेंदू शिकतो कसा? मेंदू विचार कसा करतो? यांचा समावेश होतो.संशोधनाअंती या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली आहेत.मुलांची वाढ होत असताना, त्यांना शिकवत असताना मेंदूच्या विकासाबाबतचा हा अभ्यास मोलाची भूमिका बजावतो.

             

आपल्या शिक्षणपद्धतीने जर मेंदूची कार्यपद्धती नीट लक्षात घेऊन मुलांच्या शारीरिक-मानसिक-भावनिक वाढीसाठी बौद्धिक विकासाशी सांगड घातली तर मुलं आनंदाने शिकतील, मुख्य म्हणजे शिक्षणाच्या ओझ्यापायी त्यांचं बालपण दबून जाणार नाही.


लक्षात राहणे म्हणजे नेमकं काय?

बाळाचा जन्म झाल्यावर पहिल्या पाच  मिनिटात मेेंदूमधील न्यूरॉन्सच्या पेशी सुट्टया स्वरूपात असतात.'आठवण' (memory)ही न्यूरॉन्स जोडण्याच्या स्वरूपात साठवलेली असते. नंतर जसजशे मुलाला अनुभव मिळत जातात,तसतसे या न्यूरॉन्सच्या जोड्या तयार होतात. या न्यूरॉन्सच्या जोडीला जशी practice मिळेल तेव्हा त्याभोवती Myelin sheath तयार होते. एव्हढं झाल्यानंतर ती गोष्ट माणसाच्या लक्षात राहते.


थोडंसं समजून घेऊया. एखादी गोष्ट लक्षात केव्हा राहते? तुम्ही बसमधून प्रवास करत आहात, तुमच्या शेजारी असलेली व्यक्ती तुमच्या लक्षात  राहते का? केव्हा राहते? शेजारी बसलेली व्यक्ती पुन्हा पुन्हा भेटली तर, ती व्यक्ती वैशिष्टयपूर्ण असेल तर आपल्या लक्षात राहील, अन्यथा नाही.आता, हेच उदाहरण शाळेत लागू करायचे म्हटले तर काय होईल? याचा विचार करा बघू? विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये जास्तीत जास्त न्यूरॉन्सच्या जोड्या तयार झाल्या पाहिजेत.त्यासाठी वेगवेगळे अनुभव त्याला दिले पाहिजेत.ते पुन्हा पुन्हा व वैशिष्टयपूर्ण असायला पाहिजेत. 


या ठिकाणी हे लक्षात घ्यायाला हवं की जरी सराव चांगला दिला आणि आहार चांगला म्हणजे प्रोटीनची कमतरता असेल तर Myelin sheath तयार होणार नाही


मेंदूचे मुख्य तीन विभाग कोणते ?

 1. Neo cortix

मेंदूच्या या भागात आपणविचार करू शकतो.भाषा शिकणे, भाषेचे आकलन या विभागात होत असते.
 

2. Emotional brain

मेंदूच्या या भागात आपण भावनिक परिस्थिती हाताळत असतो.

3.reptilian brain

या विभागाला मराठीत 'अस्तित्व जपणारा मेंदूचा भाग'असे म्हणतात.

म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या मुलावर रागावता
किंवा त्याला मारता तेव्हा त्याच्या मेंदूतील रक्तप्रवाह या विभागात वाहत असतो. अशावेळी मूल त्याचं स्वतःचं अस्तित्व जपण्याचा निर्णय घेतं. ते तुमच्यापासून दूर पळून तरी जातं, किंवा एकदम शांत राहण्याचा निर्णय घेतं. आणि शेवटी बंड करून मी हे करणार नाही असे सांगू शकते.

त्यामुळे राग दाखवला म्हणजे मुलांना येईल हा जो समज आहे तो चुकीचा आहे असे आपल्या लक्षात येईल.जिथे आपल्यावर हल्ला होतो, ते ठिकाण, ती व्यक्ती आपल्याला आवडत नाही. मुलांचेही तसेच आहे.




मानवी मेंदू वेगळा कसा?

आपल्याला माहीत आहे की, या पृथ्वीवर सर्वप्रथम अमिबा सारखा प्राणी तयार झाला.

उत्क्रांती होत होत लाखो वर्षानंतर मासा तयार झाला.जो सुरक्षित ठिकाणी अंडी घालतो पण त्यानंतर तो तिकडे फिरत नाही, विसरून जातो.त्यानंतर लाखो वर्षे गेली आणि बेडकासारखे उभयचर प्राणी तयार झाले.यानंतर पुन्हा लाखो वर्षे गेली आणि फक्त जमिनीवर राहणारे मांजर कुत्रा यांसारखे सस्तन प्राणी तयार झाले.हे प्राणी  पिल्लांना जन्म देतात. त्यांची काळजीही घेतात.पण त्यांचा मेंदू थोड्या दिवसानंतर आपल्या पिल्लांना विसरून जातो.

त्यानंतर उत्क्रांतीच्या एका टप्प्यात माकडांची एक जात(apes)  यांची एक टोळी  आफ्रिकेत पोहोचली. या ठिकाणी त्यांना फळं, कंदमुळं यामधून अगदी उच्च दर्जाची प्रथिने खायला मिळाली.आणि त्यामुळे मेंदूमध्ये अनेक कार्यक्षेत्रे तयार झाली. पुढे याच माकडांपासून उत्क्रांत होत आजचा  माणूस अस्तित्वात  आला. त्यामुळे गाणी ऐकणे, गाणी म्हणणे, वेगवेळ्या प्रकारे प्रतिसाद देणे,चित्र काढणे, या गोष्टी माणूस करू शकतो.

कोणत्या गोष्टी कायम लक्षात राहतात ?

तुम्हाला लहणपणीच्या कोणत्या घटना आठवतात? असे विचारले तर उत्तर काय असेल? 

आठ दिवसापूर्वी काय जेवले होते हे बहुतेकांना सांगता येणार नाही पण स्वतःच्या लग्नात काय जेवण होते हे सर्वांना आठवते.

याचे कारण काय आहे? भावनिक गुंतवणूक.नाविन्यपूर्ण अनुभव

आता हेच शाळेच्या बाबतीत कसे लागू करणार? मुलांना अनुभव देताना या गोष्टींचा विचार केल्यास आपण दिलेले अनुभव त्यांच्या चिरंतन लक्षात राहतील. जेव्हा तुम्ही नवीन गोष्टी शिकत नसतात तेव्हा न्यूरॉन्सच्या जोड्या तयार होत नाहीत.तुमचे आयुष्य थांबलेले असते.न्यूरॉन्स connect होणं म्हणजेच शिक्षण आहे.

  म्हणूनच 'नावीन्य संपले आयुष्य संपले' असे म्हणतात.


मुलांना मारू नका, समजून घ्या डाऊनशिफ्ट थेअरी !

मेंदूच्या रचनेत भावनिक कप्पा(emotional brain) खाली, तर विचार करणारा कप्पा(nio cortex) वर असतो. 
जेव्हा मूल तणावात असते तेव्हा रक्तप्रवाह भावनिक कप्प्याकडे वाहत असते.अशावेळी त्याचा nio cortex हा भाग जास्त कार्यक्षम नसतो.


स्टेजवर गेल्यावर मुलाला काही आठवत नाही किंवा परीक्षेच्या वेळी मला काहीच आठवत नव्हते असे म्हणणाऱ्या मुलांच्या बाबतीत काय होते हे तुम्हाला आता समजले असेल.सतत मार, असंतुलित आहाराचा मुलांवर वाईट परिणाम होतो, कारण अशावेळी रक्तप्रवाह आणखी खाली म्हणजे अस्तित्व टिकवणाऱ्या कप्प्याकडे होतो.

आता तुम्हाला समजले असेल की मारले म्हणजे मुलांना येईल ही समजूत किती चुकीची आहे. ज्या मुलांना सतत मार बसतो त्यांचे न्यूरॉन्स तुटण्याची शक्यता असते. म्हणजे आतापर्यंत जे ते शिकलेत तेही ते विसरून जाऊ शकतात. आणि म्हणूनच मुलांशी नेहमी प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, विश्वासातचे नाते निर्माण करता आले पाहिजे.

'मुलांनो शांत बसा' असे म्हणू नका !

मेंदूच्या डाव्या आणि उजव्या बाजुला जोडणारा एक भाग असतो ज्याला  Corpus callosum असे म्हणतात. चालण्यामध्ये व इतर गोष्टीत समतोल राखण्यासाठी त्याची व्यवस्थित वाढ होणं गरजेची असते.8 वर्षापर्यंत मूल जितके जास्त खेळेल, हालचाल करेल तितके चांगले असते.

त्यामुळे सतत शांत बसा असे म्हणणे चुकीचे आहे हे आपल्या लक्षात येईल.


तुमच्या मुुलाचा कल काय आहे ?तुम्हीच ठरवू शकता !

तुमच्या मुलाचा कल काय आहे, हे ठरवण्यासाठी आजकाल कलचाचणी घेतात.पण खालील क्षमतांचा अभ्यास केल्यास अश्या कलचाचणीची गरजच नाही असे आपल्या लक्षात येईल.


1. भाषिक- वाचिक:

ही मुलं भाषा चांगल्या प्रकारे आत्मसात करू शकतात.चांगलं बोलू शकतात.


2.mathematical/logical:

शाळेत जातांना सायकल पंक्चर झाली.आता काय करायचं? सायकल तिथेच लावायची? सायकल घेऊन दुकानात जायचे? परत घरी जायचे? अशावेळी योग्य निर्णय घेणाऱ्यांत ही क्षमता असते.


3. निसर्गविषयक:

आत्ता या क्षणापासून पुढील 2 वर्ष तुम्ही जंगलात राहायला जाणार आहात असे सांगितल्यावर जे खरोखर तयार होतील त्यांच्यात ही क्षमता असते.


4. दृश्य- अवकाशीय:

चित्रकला, शिल्प जे छान प्रकारे करु शकतात. त्यांच्यात ही क्षमता असते.


5. आंतरव्यक्ती:

या क्षमता असलेल्या व्यक्तींना व्यक्ती-व्यक्ती मध्ये उत्तम प्रकारे समन्वय प्रस्थापित करता येतो. उदा. शिक्षक, प्राध्यापक.


6.व्यक्तिअंतर्गत :

या क्षमता असणाऱ्या व्यक्ती स्वतःशी विचार करून theory मांडतात. उदा. महात्मा गांधी.


आता, वरील सहा क्षमतांपैकी कोणत्या मुख्य चार क्षमता तुमच्या मुलांमध्ये दिसून येतात हे तुम्हांला ठरवता येईन.अशाच प्रकारे  मूल आणि पालक एकत्रित बसले आणि या क्षमता पहिल्या तर कोणत्याही कलचाचणीची आवश्यकता राहणार नाही.


  तेव्हा, चला तर मग मित्रांनो, मेंदूच्या कलाने घेऊया.. जास्तीत जास्त न्यूरॉन्स च्या जोड्या तयार करूया, आणि समृद्ध आयुष्य जगुया...



अशाच प्रकारचे महत्वाचे शैक्षणिक अपडेट्स थेट मोबाईलवर (whatsapp)मिळवा..👇

https://chat.whatsapp.com/BDffROfyenP2sZQI93Cijp

अशाच प्रकारचे महत्वाचे शैक्षणिक अपडेट्स थेट फेसबुकवर मिळवा..👇

https://www.facebook.com/groups/379344020177108/?ref=share

या अगोदर प्रसिद्ध झालेले व पुढील शैक्षणिक अपडेट्स थेट टेलिग्रामवर मिळवा👇

https://t.me/schoolcompanion07










      

Post a Comment

2 Comments

  1. खूपच छान लेख आहे.मुलांचा कल घरच्या घरी पालक म्हणून ओळखतात आला तर करीयर निवडण्यासाठी खूप मदत होईल.

    ReplyDelete