गोरा-रवींद्रनाथ टागोरांनी पाहिलेले स्वप्न शंभर वर्षानंतरही स्वप्नच!
सुमारे शंभर वर्षांपूर्वी रवींद्रनाथ टागोरांनी गोरा ही कादंबरी लिहिली. कादंबरी लिहिली असं म्हणण्यापेक्षा, एक स्वप्न पाहिले असे म्हणणे अधिक उचित ठरेल.माझ्या स्वप्नातला भारत असा असावा- असेच जणू त्यांना या कादंबरीतून सांगायचे आहे, असे आपल्याला पदोपदी जाणवते.अर्थात यात त्यांनी कोणतेही प्रवचन दिलेले नाही.समर्पक पात्रांची पेरणी,त्यांच्या तोंडी दिलेले प्रवाही, विवेचनपूर्व संवाद यामुळे कादंबरी अतिशय उत्कंठावर्धक झाली आहे.या कादंबरीला नोबेल पुरस्कार मिळाला, यातून टागोरांनी पाहिलेले स्वप्न उदात्त होते, हे अधोरेखीतच झाले आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, अवघ्या भारतात ब्रिटिशांचा अंमल चांगलाच पसरलेला असतांना,त्याकाळी ब्रिटिशांची राजधानी असलेल्या कोलकाताच्या(पश्चिम बंगाल) परिसरात कादंबरी आकार घेते. त्याकाळच्या सामाजिक, धार्मिक पार्श्वभूमीवर, आकाराला येणाऱ्या दोन समांतर प्रेमकहाण्या (गोरा आणि सुचरिता, विनय आणि ललिता )-असे या कादंबरीचे वर्णन करता येईल.अर्थात ते खूपच वरवरचे, आणि ढोबळमानाने होईल हे खात्रीपूर्वक सांगता येईल.इंग्रजी राजवट, त्यांचा येथील जनतेवरील अत्याचार, ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी चाललेला आटापिटा, या भूमीवरील हिंदू,नव्याने उदयास आलेला ब्राह्म समाज, त्यावेळी असलेले सामाजिक जीवन, चालीरीती, तरुणाई-वैचारिक बैठक, इंग्रजांकडे नोकरीस असणारी आपली लोकं या सगळ्याच गोष्टींचा टागोरांनी यात खूप चांगल्या प्रकारे आणि उत्कंठावर्धकपणे परामर्ष घेतला आहे.
गौरमोहन(गोरा) हा एक अतिशय तेजस्वी, कुशाग्र बुद्धिमत्तेचा, तात्विक चर्चेची आवड असणारा तरुण असतो. खरंतर,तो चांगल्या आणि वाईट गोष्टीत सहज फरक करू शकतो.सुरुवातीला केशवबाबूंच्या भाषणावर मोहित होऊन गोरा ब्राह्म समाजाकडे झुकला.परंतु त्याच दरम्यान एका इंग्रजी मिशनऱ्याने हिंदू धर्मावर व समाजावर टीका करणारा लेख वर्तमानपत्रात लिहिला. आपल्या देशावर त्यातील धर्मावर झालेली टीका गोराला सहन होत नाही. उत्तर म्हणून गोरा त्या चर्चेत सहभागी होतो.आरोप प्रत्यारोप होतात.शेवटी एक दिवस 'या विषयावरील चर्चा आता बंद करण्यात येत आहे' असे संपादकांना जाहीर करावे लागते..पुढे परिस्थिती अशी होते, की गोरा एक कर्मठ हिंदू बनतो. ब्राम्ह समाजातील सुचरिता आणि गोरा मध्ये तात्विक चर्चा होत असे.आपणही एका दलाचे आहातच ना? या सुचरिताच्या प्रश्नावर "मी हिंदू आहे. हिंदू हे कुठलं दल नाही. ती जाती आहे. ही जाती इतकी मोठी आहे की, तिचं जातित्व कुठल्याच परिभाषेत मांडता येणार नाही.समुद्राची लाट म्हणजे काही समुद्र नाही, तसंच कुठलंही दल म्हणजे हिंदू नाही." असं उत्तर गोरा देतो. या भारतभूमीवर राहणारे सर्व हिंदू आहेत.आणि येथे राहणाऱ्या सर्व लेकरांची आई माझी भारतमाता आहे.तेव्हा सर्वांनी भारतमातेच्या संरक्षणासाठी पुढे यायला हवे.आपल्यातले भेदभाव आपली शक्ती कमी करतात, आणि याचा फायदा परकीय लोक घेतात-गोरा म्हणतो.गोराला हिंदू धर्मातील काही वाईट चालीरीती, प्रकार माहीत होते.त्या प्रकारांनी तो अस्वस्थही होत असे.पण त्याच्या स्वभावातला हट्टीपणा, हार न मानण्याची विजिगुशी वृत्ती, समोरच्याचा मुद्दा आक्रमकपणे खोडून काढण्याची सवय यामुळे त्याच्या लेखी या गोष्टी गौण ठरवल्या गेल्या होत्या. ब्राह्म समाजातील सुचरिता बुद्धिमान आहेच.विनयशील आहे.दुसयाच्या मताचा आदर करत जे चुकीचे आहे ते स्पष्टपणे सांगणारी आहे.आणि म्हणून सुचरिता आणि गोरा एकमेकांस पूरक ठरतात. गोराला काही क्षण सुचरितामध्ये भारतमातेचा आभास होतो. भारतभूला आपलं पुण्य, सौंदर्य, प्रेम,याद्वारे माधुर्य आणि पावित्र्य प्रगट करण्यासाठीच जसा काही तिचा जन्म झाला आहे असे त्याला वाटते.आपण जे भारतमातेच्या सेवेचे व्रत हाती घेतले आहे, त्यात सुचरिता बरोबर असल्याशिवाय परिपूर्णता येणार नाही.असे त्याचे मन सांगते.पण गोरा कर्मठ हिंदू तर सुचरिता ब्राह्म समजातील आहे!!
परेशबाबू ब्राह्म आहेत.त्यांना ललिता, लावण्या, लीला अश्या तीन मुली आहेत.दूरच्या एका नातेवाईकाची सुचरिता, मुलगी म्हणूनच लहानपणापासून ते वाढवतात.संयम, समजूतदारपणा, हे गुण परेशबाबूंकडे आहेतच.पण कोणत्याही परिस्थितीत शांत वृत्तीने विचार करून योग्य गोष्टीला पाठिंबा देण्यात ते मागेपुढे पाहत नाहीत. गोराचा जिवाभावाचा मित्र विनय ललिताच्या प्रेमात पडतो.विनय समोरच्याच्या बोलण्यावर पट्कन विश्वास टाकणारा, एखाद्या निर्णयावर ठाम न राहणारा आहे. याउलट ललिता आत्मविश्वासू, धीरगंभीर, एकदा निर्णय घेतल्यानंतर मागे न हटणारी आहे. पण या दोघांच्या किंवा गोरा आणि सुचरिताच्या बाबतीत, समाजातून जोरदार टीका, अपमानास्पद वागणूक मिळत असतानाही,परेशबाबूंनी ज्याप्रकारे परिस्थिती हाताळली, ती आदर्शवत म्हणावी लागेल.सदसद्विवेकबुद्धी जागरूक असणारा व्यक्ती जाती-पातीच्या संकोचीत विचाराच्या पलीकडे विचार करत असतो.धर्मांधतेचा विळखा अश्या व्यक्तीला बसलेला नसतो.त्यामुळे तो स्थिर बुद्धीने विचार करू शकतो. त्यामुळे काय योग्य हे ठरवण्यासाठी त्याला धर्माच्या, आपल्या जातीच्या, पंथाच्या, कुबड्या घेण्याची आवश्यकता नसते.अशी व्यक्ती दाखवण्यासाठी टागोरांनी रूपक म्हणून परेशबाबूंचे पात्र उभे केले आहे, असे वाटते.याप्रमाणेच गोराची आई आनंदमयी ही निरक्षर असते.पण तीही स्वतंत्रपणे निर्णय घेणारी आहे.प्रसंगी योग्य निर्णय घेण्यासाठी समाजाचा विरोध पत्करणारी आहे.याचप्रमाणे लालची महीम, स्वार्थी अविनाश, इंग्रजांची चाकरी करण्यात आनंद मानणारा पानुबाबू, वरदासुंदरी, हरिमोहिनी अशा वेगवेगळ्या मानवी स्वभावाच्या पात्रांची पेरणी कादंबरीत आहे.
शेवटी असे काय होते की, कट्टर हिंदू, जात,पात मानणारा गोरा या सगळ्या गोष्टी चुकीच्या मानतो, अधिक समजूतदारपणा असणाऱ्या ब्राह्म समाज त्याला जवळचा वाटू लागतो.कादंबरीच्या शेवटी आईला "आई, तूच माझी आई आहेस.ज्या आईला मी शोधत फिरत होतो,ती तर इथे माझ्या खोलीतच बसलेली होती.तुझी जात नाही. तू उच्च-नीच याचा विचार करत नाहीस.कुणाची घृणा करत नाहीस.तू केवळ कल्याणाची प्रतिमा आहेस.तू माझी भारतभूमी आहेस!- असे गोरा का म्हणतो. रवींद्रनाथ टागोर इथे रुपकातून काय सांगू इच्छितात? जाणून घेण्यासाठी मुळातच ही भावभावनांनी विभोर अशी कादंबरी वाचायलाच हवी.
आज आपल्या आजूबाजूला पाहिले असता आपल्या लक्षात येईल की जातीयता, धर्मांधता कुठेही कमी झालेली नाही.आजही आपापल्या जातीचे कंपू, दल, संघटन, करूनच लोकं राहतात. एखादी व्यक्ती भेटल्यावर त्याला आडनाव विचारले जाते.(बहुतेकवेळा)त्यामधून त्याची जात जोखण्याचाच आटापिटा असतो.धार्मिक अधमपणा एव्हढा वाढलाय की कोणी काय खायचं याचा निर्णयही हे धर्मरक्षक टोळभैरव ठरवत आहेत.राजकारणी लोकं याला पद्धतशीरपणे खतपाणी घालत आहेत. जो तो पुढारी आपल्याच जातीच्या समूहाची री ओढत आहेत.आणि अशा संधीसाधू पुढाऱ्यांचे फोटो जातीतील लोकांच्या खिशात! एव्हढेच नाही तर ऐतिहासिक महापुरुषही यांनी जातीनुसार वाटून घेतले आहेत. आजही निवडणुका जातीपातीवर, धर्मावर, लढवल्या जातात. निवडणुका जवळ आल्यानंतर धार्मिक कलह आपोआप उद्भवतात! यातून फक्त असुरक्षितता वाढीस लागते.देशातील तरुण जो भावी नागरिक आहे, त्याची ऊर्जा भलत्याच ठिकाणी वाया जाते आहे.परिणामी देशाचा विकास खुंटतो...
आणि हेच रवींद्रनाथ टागोरांना नको होते.हा देश म्हणजे माझी माता आहे.आणि माता कधी उच-नीच ,जात-पात असा भेदभाव करत नसते.असंच जणू त्यांना सांगायचे होते.पण त्यांनी पाहिलेले स्वप्न आजही स्वप्नच आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. त्यांच्या स्वप्नातला भारत आता, कोणाकोणाला खुनावतोय हाच एक मोठा प्रश्न आहे. मला?तुम्हाला?
-पिनेश जाधव

0 Comments