भयकथा किंवा गूढकथा यांच्या वाट्याला मी सहसा कधी गेलोच नाही. एव्हढेच नाही तर, रात्री उशिरा दूरचित्रवाणी वरच्या अशा मालिकाही मी कधी बघितल्या नाही.पण इथेच(फेसबुक) काही समूहामध्ये अश्या कथां, भयपटाबद्दल माहिती वाचली.आणि माझ्या लक्षात आले की गूढकथा लिहिणे किंवा असे चित्रपट तयार करणे हे कोणाचेही काम नाही! साहित्यात नऊ रसांचा अंतर्भाव असतो, हे आपण सर्वजण जाणतोच, आणि त्यात 'भयानक' हाही एक रस आहे.त्यात भीतीदायक निर्मिती असते.....मुळात चित्रपटात आपण मान्य करू शकतो की ,तिथे तंत्रज्ञानाचा वापर करून तशी वातावरणनिर्मिती आपण करू शकतो.पण पुस्तकाचे काय? फक्त शब्दांतून गूढ किंवा भयाची भावना लेखक कशी काय निर्माण करू शकतो? असा विचार मी करू लागलो. आणि याचा अनुभव घेण्यासाठी म्हणा किंवा अभ्यास करण्यासाठी म्हणा मी असे पुस्तक वाचायचे ठरवले! आणि मग शोध सुरू झाला मराठीत गूढकथा/भयकथा लिहिणाऱ्या लेखकांचा. त्यात श्री.नारायण धारप आणि श्री. रत्नाकर मतकरी यांच्या नावाला चांगलेच वलय आहे. तर..रत्नाकर मतकरी हे फक्त याच प्रकारचे लेखन करतात असे मुळीच नाही. नाटकांचे लेखन, निर्मिती, दिग्दर्शन, संगीत अश्या सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमठवला आहे.त्यांनीच लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून' खेकडा' हा कथासंग्रह मी वाचण्यासाठी घेतला!
या कथासंग्रहात एकूण 11 गूढकथा आहेत.ह्या सर्व कथा याअगोदरच हंस या मासिकातून प्रकाशित झालेल्या आहेत.खेकडा, कुणास्तव कुणीतरी, अंतराय,कळकीचे बाळ, पावसातला पाहुणा, शाळेचा रस्ता, ती मी आणि तो, निमाची निमा, एक विलक्षण आरसा, आल्बम, तुमची गोष्ट अशी कथांची नावे आहेत.
यातील खेकडा ही कथा बरीच प्रसिद्ध आहे. खेकड्याचा यांत रुपकासारखा उपयोग केला आहे.माणसाचे मन हेच एक गूढ आहे. ते कोणत्या प्रसंगी काय विचार करेल कोणीही सांगू शकत नाही.स्वच्छंदी, आनंदी आयुष्याची व्याख्या काय करता येईल?
कुणास्तव कुणीतरी या कथेमध्ये रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांचे विदीर्ण वास्तव, त्यांचे मनोविश्व, रेखाटले आहे.
अंतराय या कथेत दोन मित्रांची गोष्ट सांगितली आहे.संशयाचा फास असा काही यात ओवला आहे की आपण त्या गूढ वातावरणात हरवून जातो.
कळकीचे बाळ ही कथा वाचताना 'मन गलबलून जाणे' या वाक्प्रचाराचा शब्दशः अर्थ मनात रिंगा घालतो.
पावसातला पाहुणा-रोमांचक शेवट कसा असू शकतो! हे पहायचे असेल तर ही कथा वाचायला हवी.
शाळेचा रस्ता या कथेत एका शाळकरी मुलीची कथा सांगितली आहे. ह्या कथेचा प्रभाव अनेक दिवस आपल्यावर राहतो.यातच सर्वकाही आले.
ती, मी आणि तो गूढ आणि रोमांचक अशी ही कथा खून करणारा आणि पोलीस यांच्यातील पाठशिवणीचा खेळ आहे. आणि शेवट आश्चर्यचकित करणारा.
निमाची निमा -एका लहान मुलीची ही कथा मनाचा ठाव घेणारी आहे.
एक विलक्षण आरसा या कथेत दोन बहिणींच्या स्वभावामुळे, आणि जोडीला आरसा घेऊन गूढ तयार केले आहे.
आल्बम - घरातील माणसांच्या एकापाठोपाठ हत्या, आल्बमचा संबंध याद्वारे गुढनिर्मिती केली आहे.
तुमची गोष्ट-ही कथा जशी काय तुमच्याबरोबर घडते आहे, अशी वर्णिली आहे! थरारक असे वर्णन यात केले आहे. आणि नकळत आपण स्वतःला अपराधी समजायला लागतो, आणि हेच त्या कथेचं श्रेष्ठत्व ठरते.
वरील सर्व कथा या भय/गूढ आहेत. तरी सुद्धा कथेबद्दल मी जे काही एक दोन वाक्य लिहिली आहेत, त्यावरूनच आपल्या लक्षात येते की त्या वास्तवतेला धरून आहेत. लेखक त्यामधूनही आपल्याला काहीतरी सांगू इच्छितो.आणि म्हणूनच या कथा (गूढ तयार करण्यासाठी काहीतरीच सांगितल्याने)बीभत्स न ठरता वास्तववादी गूढ कथा ठरतात!आणि म्हणूनच या कथांचा परिणाम दीर्घकाळ आपल्या मनावर राहतो. भय ही भावना तुम्हाला अनुभवायची असेल, आणि अवघे मनोव्यापार झपाटून टाकणारे असे काही वाचायचे असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे!!!
- पिनेश जाधव.

0 Comments