14 स्टोरीज दयाट इन्स्पायर्ड सत्यजित राय!
गेल्या महिन्यात अजब पुस्तक प्रकाशनाच्या ठाण्यातील प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गेलो होतो.पुस्तकांवर नजर टाकत, मधूनच एखादं पुस्तक हातात घेऊन चाळत पुढे जात असताना या पुस्तकावर नजर गेली. सत्यजित राय असे मोठ्या अक्षरात नाव त्यावर होते.चित्रपट पाहण्याची,संबधित वाचन करण्याची आवड असल्याने भारतीय चित्रपट सृष्टीतील या प्रतिष्ठित नावाबद्दल मनात नेहीमीच कुतूहल राहिले आहे.'14 स्टोरीज दयाट इन्स्पायर्ड सत्यजित राय' असे पुस्तकाचे नाव आहे आणि ते संकलित व इंग्रजी भाषांतरीत केले आहे भास्कर चटोपाध्याय यांनी.मराठी अनुवाद केला आहे लेखिका गीता गद्रे यांनी!
या पुस्तकात एकूण 13 कथा आहेत.देवी,डरपोक माणसाची कथा,पाहुणा, गुपी गातो वाघा वाजवतो,परीस, प्रस्तावना, बिरींचीबाबा, मणिमालिका, पोस्टमास्तर, शेवट, बुद्धिबळाचे खेळाडू, गाण्याचे दालन, पिकूची डायरी.. आणि मला हेही सांगायला हवे की, जलसाघर, देवी ,कांचनगंगा या सुप्रसिद्ध चित्रपटात महत्वाची भूमिका छबी विश्वास यांनी केली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर सत्यजित राय यांना श्रद्धांजली वाहिली.ती लेखरूपात याच पुस्तकात पुनर्मुद्रित करण्यात आली आहे.त्यानंतर देवी चित्रपटातील भूमिकेबद्दल लेख लिहिला आहे स्वतः शर्मिला टागोर यांनी! त्यानंतर अभिनेता धृतीमान चटर्जी यांची भास्कर चटोपाध्याय यांनी घेतलेली मुलाखत आहे. आणि शेवटी सत्यजित राय सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुप के डे यांची भास्कर चटोपाध्याय यांनी घेतलेली मुलाखत आहे. हा एक दस्तऐवज आहे! यामुळे या पुस्तकाचे उपयुक्तता मूल्य वाढले आहे.
या सर्व कथा वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या आहेत.मूळ कथांचा विचार केला तर दोन हिंदी तर बाकी सर्व बंगाली आहेत. त्यामुळे अर्थातच, या कथांना,त्यातील पात्रांना, त्यातील ठिकाणांना तेथील प्रांताचा गंध जाणवतो.त्यामुळे या कथा वाचल्यानंतर आपण एका वेगळ्या प्रांतात हळुवारपणे मुशाफिरी करून आल्याचा अवर्णनीय आनंद मिळतो. या कथा स्वतः सत्यजित राय यांना भावलेल्या आहेत. याच कथांवर त्यांनी असे उत्कृष्ट चित्रपट तयार केले आहेत, की आजही त्या चित्रपटांचा अभ्यास केला जातोय.कथा वाचल्यानंतर- या कथेवर चित्रपट कसा तयार केला असेल- असा विचार हमखास आपल्या मनात येतो.(हा चित्रपट बघावाच लागेल- मनोमन आपण ठरवून टाकतो.)
देवी या कथेवर त्यांनी देवी हा चित्रपट बनवला. ज्यात आपल्या शर्मिला टागोर यांनी देवीची भूमिका केली आहे. भास्कर चटोपाध्याय यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी ही त्यांची सर्वात आवडती भूमिका असल्याचे सांगितले आहे.देवीचं कथासूत्र आजच्या काळातही इतके समर्पक आहे-खरंतर हे जाणून आपल्याला दुःख होते.(ही कथा अंधश्रद्धेवर बेतलेली आहे)
जलसाघर (the music room) या कथेतील विश्वमभर राय या संगीताची आवड असणाऱ्या स्वाभिमानी राजाने आपल्या मनातील हळवा कोपरा काबीज नाही केला तरच नवल!!ही कथा एव्हढी सुंदर आहे की आपण ती पुन्हा पुन्हा वाचतो.
मला वैयक्तिक विचाराल तर ,मला यातील सर्वात जास्त आवडलेली कथा म्हणजे-डरपोक माणूस! कथेची सुरुवात, कथेचा मध्यंतर, आणि कथेचा शेवट!! अवर्णनीय!!
अनुवाद बऱ्यापैकी जुळून आला असला, तरी कुठेतरी कसर राहून गेली, असे वाटत राहते , पण कथाच एव्हढ्या चांगल्या असल्याने आपण लेखिकेला धन्यवादच देऊयात!!!! बंगाल प्रांताची लहानशी सहल तुम्हाला करायची असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.☺
-पिनेश जाधव.

0 Comments