अशोक गांगुली हा बंगाली कुटुंबातील पुस्तक वाचण्याची आवड असणारा तरुण असतो.एकदा नातेवाईकांकडे जात असतांना रेल्वेला अपघात होतो, पण त्यावेळी अशोक रशियन लेखक निकोलाय गोगोल यांचे पुस्तक वाचत असतो.आणि त्या पुस्तकामुळेच त्या भयंकर अपघातातून वाचतो.पुढे काही वर्षातच अपघाताच्या थोड्या वेळ अगोदर ओळख झालेल्या घोष यांच्या सांगण्यानुसार अशोक अमेरिका गाठतो.नंतर काही दिवसातच(बंगालमध्ये जाऊन) अशोकचे अशिमाबरोबर ठरवून प्रेमविवाह होतो. बाळाला जन्म देण्यासाठी अशिमा गांगुली दवाखान्यात दाखल झालेली असते. यावेळी ते दोघेच दवाखान्यात हजर असतात,त्यावेळी बंगालमध्ये असतो तर.....ही तिच्या मनातील उलघाल अतिशय भावस्पर्शी आहे. बाळाचे नाव आजी ठरवणार होती, तसे दोन्ही (मुलगा/मुलगी ) प्रकारचे नाव पत्रात आजीने पाठवली होती.पत्र अजून आले नव्हते. पण जन्मदाखला देताना नाव तर ठेवावेच लागणार असे दवाखाण्यात सांगितल्यानंतर अशोक आणि अशिमा यांनी गोगोल या नावावर तात्पुरते शिक्कामोर्तब केले.तर गोगोल हे या कादंबरीतील मुख्य पात्र आहे.
अशोक आणि अशिमा अमेरिकेत राहून, आपलं मूळ, बंगाली परंपरा न विसरणारे, आणि म्हणूनच कधिही तिथले न होणारे...तर गोगोल आणि त्याची बहीण सोनिया अमेरिकीतच लहानाचे मोठे झाल्यामुळे तिथल्या संस्कृतीत मिसळून गेल्याने, बंगालच्या रूढी परंपरा नकोसे वाटणारे ....या सर्व परिस्थितीत प्रामुख्याने गोगोलची चाललेली धडपड, नावावरून होणारा मानसिक त्रास , गोंधळ,गोगोलचे प्रेमप्रकरण, लग्न, अशोकचे अकाली जाणे, त्यानंतरची गोगोलची मानसिक स्थिती, अशिमाचा दृष्टिकोन या सर्वाभोवती कादंबरी पुढे जात राहते.
तिथे जाता जाता ते (अशोक) गोगोलला म्हणाले,"कायम लक्षात ठेव हा दिवस.कधीही विसरायचा नाही.फक्त तू आणि मी .दोघांनीच हा सुंदर प्रवास केला. अश्या जागी की पुढे जायला मार्गच शिल्लक नव्हता. ही गोष्ट सदैव स्मरणात ठेवशील ना गोगोल.( वडील या जगात नसतांना , गोगोल ला हे आठवत असते ,असा प्रसंग आहे, माझा सर्वात आवडता)
'नेमसेक' वाचतांना तुम्ही फक्त एका कुटुंबाची कथा वाचत नसता. त्या पात्रांबरोबर तुम्ही एव्हढे मग्न होतात की त्यांचे सुख तुमचे असते,त्यांच्या दुःखात तुमचे डोळे ओलसर होतात, कठीण प्रसंगी नकळत तुम्ही त्यांना सहानुभूती देत असतात.
'नेमसेक' ही प्रच्छन्न गुंतागुंत आहे......तुम्ही त्यात गुंतायलाच हवे.
-पिनेश जाधव.

0 Comments