Ticker

6/recent/ticker-posts

मुख्याध्यापक चार्ज देवाण घेवाण नियम | मुख्याध्यापक चार्ज देवाण घेवाण यादी PDF नमुना |

मुख्याध्यापक चार्ज देवाण घेवाण यादी PDF



नमस्कार..

शासकीय कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात 'बदली' हा महत्वाचा घटक असतो. शिक्षकांची एका शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली झाल्यानंतर काही वेळेस शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून चार्ज  लागतो. अशा वेळेस उपयुक्त 'मुख्याध्यापक चार्ज देवाण घेवाण यादी PDF' विविध नमुने या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.

तत्पूर्वी, नवीन शाळेत रुजू झाल्यानंतर 'मुख्याध्यापक हा चार्ज नेमका कोणी स्वीकारावा?' या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया..

RTE ACT 2009 नुसार ज्या जिल्हा परिषद शाळांमधील शाळेचा पट 150 पेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी मुख्याध्यापक पद RTE 2009 अंतर्गत संदर्भ दि. 30/09/2013 नुसार पद मंजुर करण्यात आलेले आहे. इतर शाळांना मुख्याध्यापक (उच्चश्रेणी) पद मंजूर नाही याबाबत तालुकांतर्गत मुख्याध्यापक पदाचे कार्यभाराबाबत साशंकता आहे. याबाबत खालील प्रमाणे कार्यवाही करून अंमलबजावणी करण्यात यावी.

1) ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर असून कार्यरत मु.अ. नी कर्तव्य सुची प्रमाणे कार्यभार सांभाळणे आपणावर बंधनकारक राहील परंतु सदरचे पद रिक्त असल्यास सेवाजेष्ठ पदवीधर शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा. पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त असल्यास सेवाजेष्ठ प्राथमिक शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा.

2) ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर नाही परंतू पदवीधर शिक्षकाचे पद मंजूर आहे त्याठिकाणी सेवाजेष्ठ पदविधराकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त असल्यास सेवाजेष्ठ प्राथमिक शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा.

3) ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये मुख्याध्यापक व पदवीधर पद मंजूर नाही ज्या ठीकाणी सेवाजेष्ठ प्राथमिक शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा. 4) वरील 01 ते 03 बाबी व्यतीरिक्त स्थानीक पातळीवर अडचणी समस्या असतील अशा ठिकाणी स्वतः गट शिक्षणाधिकारी यांनी ज्यांना शिक्षक / प्राथमिक पदवीधर, मुख्याध्यापकाच्या कारभाराबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित वेळोवेळी केलेले असतील त्यांनी मुख्याध्यापकांच्या कर्तव्यसूचीप्रमाणे कार्यभार सांभाळणे संबंधितावर बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी. याबाबत सर्व केंद्रप्रमुखांनी त्यांचे अंतर्गत सबंधित शाळांना एक प्रत देऊन आपण स्वतः लक्ष घालून पदभार सोपवावेत.

यासंदर्भात लातूर जिल्हा परिषद अंतर्गत सादर करण्यात आलेले पत्र वाचा....





आता, आपण मुख्याध्यापक चार्ज देवाण घेवाण यादी PDF' नमुने पाहूया...



विषय क्लिक करा
चार्ज देवाण घेवाण GR download
चार्ज देवाण घेवाण यादी PDF download 


हे ही वाचा : शिक्षक जिल्हांतर्गत बदली कार्यमुक्ती अहवाल, हजर रिपोर्ट नमुना PDF 
शैक्षणिक अभ्यासपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा : व्हॉट्सॲप ग्रुप

Post a Comment

0 Comments